शेतकरी राहतोय कंगाल; व्यापारी मालामाल

तानाजी पवार
शुक्रवार, 5 मे 2017

अॅग्रोवनने अलीकडेच भाजीपाला, फळभाज्या व फळांच्या सुमारे १८ प्रकारांच्या केलेल्या सर्वेक्षणातून शेतकरी ते ग्राहक दरातील तफावत प्रकार्षाने समोर आली आहे. 

पुणे : शहरातील ग्राहक शेतीमाल खरेदी करतो, त्या वेळी बऱ्याचदा जादा दरांबाबत नेहमी तक्रार असते. प्रत्यक्षात बहुतांशवेळा शेतकरी बाजार समितीमध्ये शेतीमाल विकतो, त्या वेळी पडले त्या भावात आडते, व्यापाऱ्यांना विक्री करावी लागते. हाच शेतीमाल मध्यस्थ साखळीद्वारे शहरात ग्राहकांना विकला जातो आणि अव्वाच्या सव्वा नफा मिळवितात, असे अॅग्रोवनने शेतकरी ते ग्राहक दराच्या केलेल्या पाहणीतील निष्कर्षातून समोर आले आहे. 

पुणे बाजार समितीत विक्रीस आलेला माल शहर, उपनगराततील मॉल, गाळे अाणि खुल्या ठिकाणी विक्री केला जातो. शेतकऱ्यांकडून अडत्यांकडे, अडत्यांकडून खरेदीदारांकडे आणि खरेदीदारांकडून मॉल, गाळे व किरकोळ विक्रीपर्यंतच्या साखळीतील नफेखोरी ग्राहकापर्यंत जाते तेव्हा शेतकऱ्याला अल्प मोबदला मिळालेला असताना ग्राहकाला तो अधिक दरानेही खरेदी करावा लागतो. 

अॅग्रोवनने अलीकडेच भाजीपाला, फळभाज्या व फळांच्या सुमारे १८ प्रकारांच्या केलेल्या सर्वेक्षणातून शेतकरी ते ग्राहक दरातील तफावत प्रकार्षाने समोर आली आहे. 

Web Title: Agrowon reveals how middlemen making whooping profits in agri business 

फोटो गॅलरी