होले झाले कलिंगड, खरबुजातील ‘मास्टर’

keshav-hole
keshav-hole

पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील बिरोबावाडी येथील केशव बबनराव होले हा उच्चशिक्षित युवा शेतकरी आहे. सध्या पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिक्षणशास्त्र विषयात होले एमफिल करीत आहेत. शिक्षण क्षेत्राबरोबरच शेतीतही चांगले करिअर करण्याकडे त्यांचा अोढा आहे. 

अशी आहे होले यांची शेती 
होले यांची वडिलोपार्जित आठ एकर शेती आहे. शेताजवळून खडकवासला धरणाचा कॅनाॅल जात असल्याने पाण्याची चांगली उपलब्धता आहे. पूर्वी हे कुटूंब ऊस, भाजीपाला अशी विविध पिके घेत होते. परंतु नफा आणि खर्च यांचा ताळमेळ बसत नसल्याने त्यांनी पर्यायी पिकांचा शोध सुरू केला. त्यादृष्टीने सन २००६ पासून खरबूज व कलिंगड या पिकांची लागवड करण्यास सुरवात केली. आजगायत या पिकांत सातत्य ठेवले आहे. 

पीक पद्धती 
कलिंगड, खरबूज- एकूण क्षेत्र सहा एकर, ऊस दीड एकर,  दोन्ही पिके कमी कालावधीची, एकरी चांगले उत्पादन देणारी असल्याने त्यांची निवड  पूर्वी जून-जुलैमध्ये कलिंगड, खरबूज घ्यायचे. तीन वर्षांपासून आता उन्हाळ्यात लागवड जानेवारीच्या दरम्यान खरबूज तर एप्रिलमध्ये कलिंगड, जून-जुलैत झेंडू ‘आत्मा’चे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश रूपनर, बारामती कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ डाॅ. मिलिंद जोशी, सुरेश पेनूरकर, समाधान भोसले, गणेश जगताप यांचे विशेष    मार्गदर्शन  

कलिंगड, खरबूज शेतीविषयी
लागवडीसाठी सर्वप्रथम जमिनीची चांगली मशागत  त्यानंतर सात फूट अंतरावर यांत्रिक पद्धतीने सरी पाडून त्यात दरवर्षी प्रतिएकरी तीन ट्रेलर कुजलेले शेणखत व बेसल डोस यांचा वापर. रोटाव्हेटरद्वारे जमिनीत चांगले मिसळून घेतल्यानंतर गादीवाफा (बेड)तयार केला जातो. 
बेडच्या मधोमध लॅटरल. त्यावर चार फूट रुंदीच्या तीस मायक्राॅन मल्चिंग पेपरचा वापर 
झिगझॅग पद्धतीने प्रतिएकरी सुमारे सात हजार रोपांची लागवड  ठिबकचा २००६ पासून वापर. कमी पाण्यात अधिक उत्पादन  खरबूज, कलिंगड व झेंडू या तिन्ही पिकांसाठी मल्चिंग वापरल्याने पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन  पाणी बचत. पांढऱ्या मुळ्यांची जोमाने वाढ होऊन पिकांची निरोगी व जोमदार वाढ.  

वेलवर्गीय पिकांवर ‘व्हायरस’, तुडतुडे, मावा आदींचा प्रादुर्भाव होतो. त्यांना रोखण्यासाठी ‘क्राॅप कव्हर’ चा २१ ते २५ दिवस वापर (फ्रूट सेटिंगपर्यंत)   गंध सापळ्यांचा वापर फळमाशी नियंत्रणासाठी  ‘क्राॅप कव्हर’मुळे शेतात असलेल्या किडींच्या संख्येचाही अंदाज येतो.   तज्ज्ञांच्या सल्ल्याने कीटकनाशके व बुरशीनाशकांच्या फवारण्या   लागवडीनंतर आठव्या दिवसापासून प्रतिएकरी दोन किलो १९ः१९ः१९ दिवसाआड पंचवीस दिवसांपर्यंत. फुलोरा अवस्थेत १३ः४०ः१३, फळधारणा अवस्थेत ००ः५२ः३४, फळ पोसत असताना १३ः०-४५ खत तसेच आवश्यकतेनुसार कॅल्शियम नायट्रेट व बोराॅनचा वापर अडीच एकरांत मधमाशीच्या दोन पेट्या ठेवल्या होत्या. त्यांच्यामुळे परागभीवन होऊन २० टक्क्यापर्यंत ‘फ्रूट सेटिंग’ झाल्याचे होले सांगतात.  

काढणी  
लागवडीनंतर ६० ते ६५ दिवसांनी काढणी  
फळाची पक्वता, आकार, रंग या गोष्टीचा विचार करून त्याचे नियोजन  
प्रतवारी करूनच फळे विक्रीसाठी पाठविली जातात.

विक्री व्यवस्थापन 
पुणे व मुख्यतः वाशी- मुंबई येथे 
शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री फरगडे फार्मर इंडिया प्रोड्यूसर कंपनी, वरवंड यांच्यामार्फत यंदा केली.
गुजरातमधील व्यापाऱ्यालाही यंदा जागेवर माल दिला.  

आलेले अनुभव  
कमी कालावधीत दोन्ही फळपिकांमधून चांगले उत्पन्न मिळवण्याची संधी 
झेंडूचा बेवड या फळपिकांसाठी चांगला. झेंडूंमुळे सूत्रकृमीदेखील रोखले जातात. 
 
शेतकऱ्यांच्या भेटी 
मावळ, गडचिरोली, मोहोळ, मंगळवेढा, श्रीगोंदा, शिरूर, शेवगाव, जळगाव, गुजरात, राज्यस्थान येथील शेतकऱ्यांनी शेतास भेटी दिल्या आहेत. 

पुरस्कार 
महात्मा फुले शिक्षणगौरव  
सहकार महर्षी अण्णासाहेब पी.के.पाटील कृषिसेवक          
‘आत्मा’ पुणे उत्कृष्ट शेतकरी       
मधुसंदेश उत्कृष्ट शेतकरी-बारामती कृषी विज्ञान केंद्र            

सन २०१५ मध्ये मुंबईला आॅगस्टमध्ये अत्यंत कमी आवक असलेल्या काळात किलोला ५६ रुपये दर होले यांच्या खरबुजाला मिळाला. सुमारे २५ टन मालाची विक्री त्या वेळी केली. 
खरबुजाला अडीच एकरांत तीन लाख तर कलिंगडाला एकरी सव्वा लाख रुपये खर्च येतो.

 केशव होले,  ९९७५५४१२७२, ७०५७७९१२७२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com