शेतकऱ्यांना बांबू लागवडीतून शाश्वत उत्पादन

जिल्हाधिकारी डॉ. विपीन; पाशा पटेल यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय बांबू लागवड कार्यशाळा
bamboo
bamboo sakal

नांदेड : बांबू हा शेतकऱ्यांसाठी हिरवे सोने आहे. बांबूपासून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादन मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकूण शेतीच्या किमान दहा टक्के शेतीमध्ये बांबूची लागवड करावी. जिल्ह्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त साडेसातशे एकरावर बांबू लागवड सुरु झाल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी केले.

‘सकाळ व ॲग्रोवन सलग्न शैक्षणिक संस्था एसआयआयएलसी’ आणि जिओलाईफ ऍग्रोटेक इंडिया प्रा. लि.च्या वतीने रविवारी (ता.१३) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे राज्यस्तरीय बांबू लागवड कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्‍घाटक म्हणून जिल्हाधिकारी डॉ. विपिन बोलत होते. या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शन कृषी मुल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल, माजी आमदार शंकरआण्णा धोंडगे, शेतकरी संघटनेचे नेते गुणवंत पाटील हंगरगेकर, भाजप महानगराध्यक्ष प्रवीण साले, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, कृषी विकास अधिकारी डॉ. तानाजी चिमणशेट्टे, बांबु लागवडीचे आंतराष्ट्रीय दर्जाचे तज्ञ कोकण व केण डेव्हलमेंटचे संचालक संजीव करपे, बांबू कापड तज्ज्ञ आशिष कासवा, एसआयएलसीचे सहसरव्यवस्थापक अमोल बिरारी, उपक्रमाची नॉलेज पार्टनर कंपनी जीओ लाईफ ॲग्रीटेक इंडिया प्राथमिक लिमिटेडचे झोनल मॕनेजर संतोष चांडक उपस्थित होते.

या वेळी कार्यक्रमाचा समारोप करताना गोदावरी समुहाच्या अध्यक्षा राजश्री पाटील म्हणाल्या की, आयुष्याच्या शेवटी बांबूची आठवण होते. हे खरे असले तरी बांबु लागडीने शेतकऱ्यांच्या जिवनात खऱ्या अर्थाने समाधान येईल, असे म्हणत त्यांनी शेतकऱ्यांना बांबु लागवडीत शेतकरी सुखी होईल असा विश्वास व्यक्त केला.

....तर प्राणवायूसाठी संघर्ष करावा लागेल : पाशा पटेल

देशात जंगलतोड मोठ्या प्रमाणावर होते. मात्र त्या प्रमाणात झाडे लावली जात नाहीत. वृक्षतोडीमुळे जमिनिची धुप होते. या मुळे शेतीसाठी हवा असलेला पाऊस वेळेवर पडत नाही आणि पडलाच तर अतिवृष्टी होते. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागते. थर्मल प्लॅंटमध्ये वापरल्या जाणाऱ्या दगडी कोळशामुळे मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होवून हवा प्रदूषित होते. कुठलाही पैसा मानवाच्या उपयोगी ठरणार नाही. त्यामुळे येणारी पिढी जगली पाहिजे असे वाटत असेल तर त्या शेतकऱ्यांनी आत्तापासूनच शेतीमध्ये बांबू लागवड केली पाहिजे.

शेतकऱ्यांनी काळाची पावले ओळखावी : संजीव करपे

अटल बिहारी वाजपेयीचे सरकार असताना त्यांनी बांबू लागवडीसाठी पुढाकार घेत कोट्यावधीचा निधी देत बांबू लागवडीस चालना दिली होती. परंतु त्यानंतर देखील आपल्या देशात म्हणवी त्या प्रमाणात बांबूची लागवड झाली नाही. चीन सारख्या देशात ५४ लाख हेक्टरवर बांबूची लागवड केली जाते. बांबू लागवडीत सर्वात पुढे असलेल्या दहा देशात भारत कुठेच दिसत नाही. मात्र बांबूपासून तयार केलेल्या शोभेच्या वस्तू खरेदीत मात्र भारत अग्रेसर आहे. देशात इथेनॉल निर्मिती सुरु झाल्यास राज्यात ५४ लाख हेक्टरवर बांबूची लागवड झाली तरी, बांबूची कमतरता जाणवेल. तेव्हा पारंपारीक शेती न करता शेतकऱ्यांनी काळाची पावले ओळखून बांबू शेतीकडे वळले पाहिजे असे संजीव करपे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com