बंद संमिश्र; बाजार समित्यांना फटका

पुणे - भारत बंदच्या पार्श्वभूमिवर गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार साेमवारी (ता.१०) सुरळीत हाेते. मात्र, शेतमालाची आवक कमी होती.
पुणे - भारत बंदच्या पार्श्वभूमिवर गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार साेमवारी (ता.१०) सुरळीत हाेते. मात्र, शेतमालाची आवक कमी होती.

पुणे - इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेससह विरोधी पक्षांनी सोमवारी (ता.१०) पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंदचे पडसाद काही प्रमाणात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजातही उमटले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी बाजार समितीतील फळ मार्केट आणि कांदा-बटाटा मार्केट बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बाजार समिती आवारात काहीकाळ तणावाचे वातावरण होते. 

काँग्रेसने पुकारलेल्या बंदला राष्ट्रवादी काॅंग्रेस, मनसेसह देशभरातील २१ पक्षांनी पाठिंबा दर्शविला होता. मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबई शहरात मनसेचे कार्यकर्ते आक्रमक होते. बाजार समितीत भाजीपाला मार्केट सकाळपर्यंत संपते. त्यामुळे भाजीपाला मार्केटच्या कामकाजावर बंदचा कोणताही परिणाम जाणवला नसल्याचे सांगण्यात आले. भाजीपाला बाजारात पुणे, नाशिक, सांगली येथून मोठ्या प्रमाणात भाजीपाला बाजारात आला. समितीत पहाटे सहा वाजेपर्यंत ६३५ गाड्यांची आवक झाली. भाजीपाल्याचे भावही स्थिर होते.

मात्र, कांदा-बटाटा मार्केट आणि फळ मार्केटचे कामकाज दिवसभर चालते. सकाळी दहाच्या सुमाराला मनसेच्या कार्यकर्त्यांनी या दोन्ही बाजारात फिरून मार्केट बंद करण्याचा प्रयत्न केला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्यांना सुरू असलेली दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. पोलिस बंदोबस्त असल्याने मार्केटमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडला नाही मात्र, काहीकाळ तणावाचे वातावरण होते. मनसेचे कार्यकर्ते गेल्यानंतर समितीतील व्यवहार पुन्हा सुरळीत सुरू झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार सुरळीत हाेते. बाजार समितीमध्ये भाजीपाल्याच्या सुमारे ६० ट्रक आवक झाली हाेती. तर कांदा बटाट्याची अनुक्रमे सुमारे ७० आणि ४० ट्रक आवक झाली हाेती. अशी माहिती अडते असाेसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली. साेमवारी आवक आणि ग्राहकदेखील कमीच असताे. त्यामुळे बंदचा काेणताही परिणाम बाजारावर झाला नसल्याचेही भुजबळ यांनी सांगितले. 

नगरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी, कॉंग्रेस, मनसेसह अन्य पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित ठिय्या अांदोलन केले. विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोणीत, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरला अांदोलनात सहभाग घेतला. कर्जत येथे रास्ता रोको अंदोलन करण्यात आले. श्रीरामपूरला बंद पाळण्यात आला.

पाथर्डीला बंद पाळून मोर्चा काढण्यात आला. श्रीगोंदा, बेलवंडी, लोणी, पारगाव, लोणी, संगमनेर, पारनेर, राहुरी, जामखेड, शेवगाव तालुक्‍यातही काही भागात बंद पाळण्यात आला. 

नागपूरला पोळ्याच्या दुसऱ्यादिवशी मारबत काढण्याची प्रथा आहे. त्यामुळे या दिवशी सर्वदूर अघोषित बंद सारखीच स्थिती राहते. कळमणा बाजार समितीदेखील यामुळे व्यवहार ठप्प झाले होते. भंडारा जिल्ह्यातदेखील कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार बंद होते. गोंदिया, गडचिरोली मध्येदेखील स्थिती सारखीच होती. वर्धा जिल्ह्यातदेखील व्यवहार बंद होते. अमरावती, यवतमाळ बाजार समितीचे व्यवहारदेखील नेहमीप्रमाणे सुरू होते. 

बंदला खानदेशात संमिश्र प्रतिसाद मिळाला. नंदुरबार, शिरपूर, नवापूर व धुळ्यात कडकडीत बंद होता; तर जळगाव जिल्ह्यात मात्र फारसा प्रतिसाद मिळाला नाही. शहादा येथे बाजार समितीमधील अडतदार व इतर व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभागी नसल्याचे जाहीर केले. तळोदा येथेही व्यापारी आस्थापने व इतर भागात व्यवहार सुरळीत झाले. 

सांगलीत बाजार समितीतील सौदे सुरू होते. काही भागात कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदचे आवाहन केल्यानंतर सुरू असलेल्या अनेक दुकानांनी ‘शटर डाऊन'' केले. हॉस्पिटल, मेडिकल दुकाने आदींसह अत्यावश्‍यक सेवा सुरूच होत्या. बॅंकाही सुरू होत्या. 

बंदला वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यांमध्ये संमिश्र स्वरुपात यश मिळाले. भारत बंदमुळे बाजार समित्यांमधील व्यवहारांवर थोडाफार परिणाम झालेला दिसून अाला. अकोला, खामगाव, मलकापूर, वाशीम, मालेगाव, कारंजा, अकोट अशा सर्वच महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये या बंदचा परिणाम दिसून अाला.

भारत बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद
मुंबई बाजार समितीत काही काळ बंदचे पडसाद
पुणे, सोलापूर, खानदेश, सांगलीत व्यवहार सुरळीत
विदर्भातील अमरावती, यवतमाळ मध्ये लिलाव बंद
वऱ्हाडातील बहुतांश बाजार समित्या ठप्प
ठिकठिकाणी रास्तारोको, ठिय्या आंदोलन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com