भुसारे यांचे हरितगृह दानशूरांच्या मदतीने पूर्ण 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 एप्रिल 2017

सकाळ माध्यम समूह माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिल्यामुळे दोन वर्षांपूर्वी पडलेले शेडनेट उभे राहिले. त्यामुळे मी मनापासून मला मदत केलेल्या प्रत्येकाचे व सकाळचे आभार मानताे. सरकारने माझ्यावर गुन्हा नोंदवलेला असून तो कायम आहे. त्यामुळे सरकारलाही मी विनंती करतो की, मला न्याय द्यावा. 
रामेश्वर भुसारे, पीडित शेतकरी, घाटशेंद्रा, ता. कन्नड, जि. औरंगाबाद 

मुंबई : मंत्रालयात न्याय मिळण्याऐवजी जबर मारहाण झालेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी रामेश्वर भुसारे यांना समाजातील दानशूर लोकांनी मदतीचा हात दिला आहे. ई-सकाळमधून भुसारे यांनी मदत देण्यासाठी आवाहन केले होते. परिणामी समाजातील दानशूर लोकांनी रामेश्वर भुसारे यांच्या खात्यावर ९५ हजार रुपये जमा केले. तर पुणेस्थित तेज अँग्रो इंडिया कंपनीने ई-सकाळच्या आवाहनाला प्रतिसाद देत ना नफा ना तोटा तत्त्वावर भुसारे यांना हरितगृह उभारून दिले आहे. 
सकाळ माध्यम समूहाच्या माध्यमातून भुसारे यांची सत्य परिस्थिती जगासमोर मांडण्यात आली. त्यामुळे पीडित शेतकरी रामेश्वर हरिभाऊ भुसारे यांच्याकडे मदतीचा ओघ सुरू झाला. भुसारेंना न्याय मिळावा म्हणून घाटशेंद्रा गावकऱ्यांनी पाडवा सण साजरा न करता काळा दिवस पाळत गाव बंद आंदोलन केले होते. गारपिठीत उद्ध्वस्त झालेल्या शेडनेटला पुन्हा उभारण्यासाठी आर्थिक मदत मिळावी म्हणून रामेश्वर भुसारे दोन वर्षापासून सरकारकडे पाठपुरावा करत आहेत. आपल्याला मदत व पुनर्वसन विभागाकडून मदत मिळावी म्हणून गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा करत होते. 

सकाळ माध्यम समूह माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिल्यामुळे दोन वर्षांपूर्वी पडलेले शेडनेट उभे राहिले. त्यामुळे मी मनापासून मला मदत केलेल्या प्रत्येकाचे व सकाळचे आभार मानताे. सरकारने माझ्यावर गुन्हा नोंदवलेला असून तो कायम आहे. त्यामुळे सरकारलाही मी विनंती करतो की, मला न्याय द्यावा. 
रामेश्वर भुसारे, पीडित शेतकरी, घाटशेंद्रा, ता. कन्नड, जि. औरंगाबाद 

आमच्या कंपनीच्या माध्यमातून आम्हाला या शेतकऱ्याला मदत करावी वाटली. सकाळमध्ये बातमी वाचल्यानंतर आम्ही या शेतकऱ्याच्या घरी जाऊन खात्री केली. त्यानंतर सामाजिक बांधिलकीतून आम्ही मदत केली आहे. 
तेजोमय घाडगे, संचालक, तेज अॅग्रो इंडिया प्रा. लि. 

Web Title: bhusare green house