राज्यात वांगी प्रतिक्विंटल ४०० ते ३००० रुपये

राज्यात वांगी प्रतिक्विंटल ४०० ते ३००० रुपये

नाशिकला प्रतिक्विंटल १२०० ते ३००० रुपये
नाशिक - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. १०) वांग्याची आवक १५५ क्विंटल झाली होती. त्यास प्रतिक्विंटल १२०० ते ३००० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २२०० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. मंगळवारी (ता. ९) वांग्याची आवक १२६ क्विंटल झाली. तिला १७०० ते ३५०० असा प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर २३५० रुपये होता. सोमवारी (दि. ८) वांग्याची आवक १६६ क्विंटल झाली. तिला १५०० ते ३००० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर २२५० मिळाला. शुक्रवारी (ता. ५) वांग्याची आवक २९१ क्विंटल झाली. तिला ७०० ते २००० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १५५० होते. गुरुवारी (ता. ४) वांग्याची आवक २८४ क्विंटल झाली. तिला १५०० ते ४००० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३३५० होते. मागील आठवड्यापासून बाजार समितीत वांग्याची आवक चांगली होती. गेल्या तीन दिवसांत आवक मंदावली असून त्यानुसार सर्वसाधारण आहे. बाजारात होत असलेल्या आवकेच्या कमी जास्त प्रमाणामुळे बाजारभावतही चढ उतार दिसून आली आहे.

सोलापुरात प्रतिक्विंटलला ४०० ते २१०० रुपये 
सोलापूर - सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात वांग्याची आवक कमी राहिली. पण, वांग्याला चांगला उठाव राहिला. वांग्याला प्रतिक्विंटलला किमान ४०० रुपये, सरासरी १२०० रुपये आणि सर्वाधिक २१०० रुपये असा दर राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात वांग्याची आवक रोज २० ते ५० क्विंटलपर्यंत आवक राहिली. वांग्याची आवक स्थानिक भागातूनच राहिली. सध्या पाणीटंचाईने आवक कमीच आहे. शिवाय त्यात अनेकवेळा सातत्यही राहिलेले नाही. या आधीच्या सप्ताहातही आवक जेमतेम २० ते ३० क्विंटलपर्यंत राहिली. वांग्याला प्रतिक्विंटलला किमान ३५० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २४०० रुपये असा दर राहिला. मार्चच्या शेवटच्या आठवड्यातही वांग्याला प्रतिक्विंटलला किमान ४५० रुपये, सरासरी १३०० रुपये आणि सर्वाधिक २२०० रुपये असा दर मिळाला. किरकोळ १०० ते २०० रुपयांचा चढ-उतार वगळता वांग्याचे दर काहीसे स्थिर राहिले.

सांगलीत प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये
सांगली - येथील शिवाजी मंडईत गतसप्ताहापेक्षा चालू सप्ताहात वांग्याच्या आवकेत वाढ झाली आहे. गुरुवारी (ता. ११) वांग्याची ९० ते १०० क्रेट (एक क्रेट २० किलोचे) आवक झाली असून त्यास प्रतिदहा किलोस १०० ते १५० रुपये असा दर होता. शिवाजी मंडईत आष्टा, दुधगाव, कवठेपिरान, तुंग, कर्नाळ, मिरज, पलूस, वाळवा, यासह कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातून वांग्याची मोठ्या प्रमाणात आवक होते. बुधवारी (ता. १०) वांग्याची १०० ते १२० क्रेट वांग्याची आवक झाली होती. वांग्यास प्रतिदहा किलोस १०० ते १५० रुपये असा दर मिळाला. 

मंगळवारी (ता. ९) वांग्याची १२० ते १५० क्रेट आवक झाली असून त्यास प्रतिदहा किलोस ८० ते १२० रुपये असा दर होता. सोमवारी (ता. ८) वांग्याची ९० ते १२० क्रेट आवक झाली होती. वांग्यास प्रतिदहा किलोस १०० ते १५० रुपये असा दर होता.  सध्या वांग्याची आवक वाढली असल्याने दर कमी झाले आहेत, अशी माहिती व्यापाऱ्यांनी सांगितले. पुढील सप्ताहात वांग्याची आवक आणि दर स्थिर राहतील, असा अंदाज व्यापारी वर्गाने वर्तविला आहे.

अकोल्यात प्रतिक्विंटल  १२०० ते १८०० रुपये 
अकोला - लग्नसराईचा काळ सुरू झालेला असल्याने येथील अकोला जनता बाजारात वांग्यांना चांगली मागणी होत आहे. वांगे सध्या प्रतिक्विंटल १२०० ते १८०० रुपये क्विंटल दराने विकत असल्याची माहिती व्यापारी सूत्रांकडून देण्यात आली. 

येथील जनता भाजी बाजारात या सप्ताहात वांग्यांची आवक रोज दोन टनांपेक्षा अधिक होत आहे. तर दर प्रतिक्विंटल किमान १००० ते १८०० दरम्यान मिळत होता. सरासरी १५०० रुपयांचा दर आहे. या आधीच्या सप्ताहात अशाच प्रकारचे दर मिळत होते. आवक कमी वाढल्यास दरांमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली. पुढील आठवड्यापासून लग्नसराई आणखी वाढत असल्याने मागणीत सुधारणा होईल. सध्या किरकोळ विक्री प्रतिकिलो ३० ते ४० रुपये दराने केली जात आहे.

औरंगाबादेत प्रतिक्‍विंटल १२०० ते १५०० रुपये 
औरंगाबाद - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत पंधरवड्यात वांग्याची आवक व दरात चढ-उतार राहिला. गुरुवारी (ता. ११) वांग्यांची ३९ क्‍विंटल आवक झाली. या वांग्यांना प्रतिक्‍विंटलचा १२०० ते १५०० रुपये दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये २० मार्चला २३ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याचे दर १००० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २६ मार्चला ५२ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याला १००० ते १३०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ३० मार्चला वांग्याची आवक २३ क्‍विंटल तर दर १५०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ८ एप्रिलला ४८ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याला ६०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ९ एप्रिलला वांग्याची आवक २७ क्‍विंटल तर दर ९०० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १० एप्रिलला २८ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याला १००० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

नगरमध्ये प्रतिक्‍विंटल ५०० ते २५०० रुपये
नगर - नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी वांग्याची ७४ क्विंटल आवक झाली. वांग्याला प्रतिक्विंटल ५०० ते अडीच हजार रुपये व सरासरी दीड हजार रुपये दर मिळाला. नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या महिनाभरात वांग्याची आवक आणि दर स्थिर आहेत.  
नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत ३ एप्रिल रोजी ६३ क्विंटल वांग्याची आवक होऊन ५०० ते अडीच हजार रुपये व सरासरी दीड हजार रुपयांचा दर मिळाला. २८ एप्रिल रोजी ५५ क्विंटलची आवक होऊन ५०० ते अडीच हजार रुपये व सरासरी दीड हजार रुपयांचा दर मिळाला. २१ एप्रिल रोजी ४४ क्विंटलची आवक होऊन ५०० ते ३००० रुपये व सतराशे रुपयांचा सरासरी दर मिळाला. १७ एप्रिल रोजी ६१ क्विंटल आवक होऊन पाचशे ते तीन हजार रुपये व सरासरी सतराशे पन्नास रुपयाचा दर मिळाला. सात एप्रिल रोजी ३६ क्विंटलची आवक होऊन ५०० ते ३००० रुपये व सरासरी १७५० रुपयांचा दर मिळाला. नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नगरसह शेजारच्या जिल्ह्यातून वांग्याची आवक होत आहे. वांग्याला मागणी असली, तरी गेल्या महिनाभराच्या तुलनेमध्ये दर स्थिर आहेत, असे बाजार समितीचे सचिव अभय भिसे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com