esakal | राज्यात वांग्याचे दर प्रतिक्विंटल ५०० ते ३५०० रुपये
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात वांग्याचे दर प्रतिक्विंटल ५०० ते ३५०० रुपये

राज्यात वांग्याचे दर प्रतिक्विंटल ५०० ते ३५०० रुपये

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

औरंगाबादेत प्रतिक्‍विंटल १५०० ते २००० रुपये 
औरंगाबाद  - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ९) वांग्यांची १६ क्‍विंटल आवक झाली. या वांग्याला १५०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये २ जुलैला ३७ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्यांना ५०० ते ७०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १० जुलैला ६७ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याला ७०० ते १००० रुपये प्रतिक्‍विटंलचा दर राहिले. १६ जुलैला २९ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याला ८०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २५ जुलैला २६ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याला ६०० ते ८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर राहिला. २८ जुलैला ३४ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याला ८०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १ ऑगस्टला ३० क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याला १००० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ६ ऑगस्टला २८ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याचे दर ६०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ८ ऑगस्टला ३२ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याला ८०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

*********************************************************

अकोल्यात प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये  
अकोला - येथील जनता भाजी बाजारात अावक होणारी वांगी सध्या ८०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान विकली जात अाहेत. प्रामुख्याने चांगल्या दर्जाची वांगी सरासरी १००० ते १५०० दरम्यान विकत अाहेत.

बाजारात सध्या वांग्यांची अावक वाढलेली अाहे. एक टनापेक्षा अधिक दैनिक अावक असून, यापेक्षा अधिक अावक झाली तर दरांमध्ये उतार येतो. सध्या बाजारात वांग्यांच्या अावकेत सुधारणा झालेली अाहे. गुरुवारी मराठा अारक्षण मागणीसाठी बंद असल्याने अावकेवर मोठा परिणाम झालेला होता. बाजारातील उलाढाल बंद सारखीच होती. बुधवारी चांगली अावक झाली होती. हलक्या ते मध्यम प्रतीचे वांगे ८०० ते १२०० दरम्यान विकले गेले. वांग्यांची किरकोळ विक्री २५ ते ४० रुपयांदरम्यान प्रतिकिलोने केली जाते.

*********************************************************
सोलापुरात प्रतिक्विंटल २५०० रुपये दर 
सोलापूर  - सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात वांग्याला उठाव मिळाला; पण दर काहीसे स्थिर राहिले. वांग्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक २५०० रुपये दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात वांग्याची आवक रोज ३० ते ५० क्विंटलपर्यंत राहिली. वांग्याची सगळी आवक ही स्थानिक भागातूनच झाली. बाहेरील आवक तुलनेने खूपच कमी राहिली. या सप्ताहात वांग्याला प्रतिक्विंटल किमान ५०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये दर मिळाला. या आधीच्या सप्ताहातही आवक रोज ३० ते ४० क्विंटल राहिली. शिवाय दरही प्रतिक्विंटलला किमान ६०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक २७०० रुपये मिळाला. तर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात हाच दर प्रतिक्विंटल किमान ५०० रुपये, सरासरी १८०० रुपये आणि सर्वाधिक २३०० रुपये असा दर मिळाला. जुलैच्या पहिल्या पंधरवड्यातही दरामध्ये फारशी तेजी राहिली नाही, दर स्थिरच होते. त्या सप्ताहात वांग्याला किमान ५०० रुपये, सरासरी १८०० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये इतका दर मिळाला. सध्या वांग्याची आवक आणि मागणी यामध्ये तफावत आहे. त्यामुळे दर काहीसे स्थिर राहिल्याचे सांगण्यात आले.
*********************************************************

कोल्हापुरात प्रति दहा किलोस ५० ते १५० रुपये
कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील बाजार समितीत वांग्याच्या आवकेत वाढ होत आहे. बाजारात वांग्याची दररोज एक ते दीड हजार करंड्या (प्रति करंडी दहा किलो) आवक होत आहे. वांग्यास दहा किलोस ५० ते १५० रुपये दर मिळत आहे. 

बाजार समितीत बेळगाव, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातून वांग्याची आवक होते. मध्यंतरी झालेल्या पावसामुळे वांग्याच्या आवकेत वाढ झाली. ती वाढ अजून टिकून असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. सध्या बाजार समितीत सांगली जिल्ह्यातील मिरज, कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, हातकणंगले तालुक्‍यात बहुतांशी करुन वांग्याची आवक सुरू आहे. 

गेल्या सप्ताहापासून वांग्याचे दर स्थिर आहेत. सध्या काही वेळेला जिल्ह्यात उष्मा वाढत असल्याने वांग्यावरील किड रोगाचे नियंत्रण करण्याबाबत दक्षता घ्यावी लागत असल्याचे वांगी उत्पादाकांनी सांगितले. येत्या काही दिवसांत तरी वांग्याची आवक वाढण्याची शक्‍यता बाजार समितीतून व्यक्त करण्यात आली.

*********************************************************

नगरला १००० ते ३५०० रुपये
नगर ः नगर बाजार समितीत मंगळवारी (ता. ७) १५ क्विंटल वांगीची आवक झाली. प्रतिक्विंटलला १००० ते ३५०० रुपये व सरासरी २२५० रुपये प्रतिक्विंटलला दर मिळाला. बाजार समितीत सरासरी १५ ते २५ क्विंटल वांगीची दर दिवसाला आवक होत असते.

बाजार समितीत २ ऑगस्टला १८ क्विटंलची आवक होऊन २००० ते ४००० रुपये व सरासरी ३००० हजार रुपये दर मिळाला. २६ जुलैला १७ क्विंटलची आवक होऊन १००० ते ३५०० रुपये व सरासरी २२५० रुपये दर मिळाला. १९ जुलैला २० क्विंटलची आवक होऊन १००० ते ३००० व सरासरी २००० रुपये दर मिळाला. तर १२ जुलैला १७ क्‍विंटलची आवक होऊन १०० ० ते २५०० रुपये व सरासरी १५५० रुपये दर मिळाला. ५ जुलैला १७ क्विंटलची आवक होऊन १००० ते २५०० रुपये व सरासरी १७५० रुपये दर मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव अभय भिसे यांनी सांगितले.

loading image