सातगाव पठार परिसरातील वेळ नदीवरील बंधारे तुडुंब

सातगाव पठार परिसरातील वेळ नदीवरील बंधारे तुडुंब

सातगाव पठार, जि. पुणे - सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागात दमदार पावसाने बळिराजा सुखावला आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे वेळ नदीवरील बंधारे तुडुंब भरले आहेत. सातगाव परिसरातील ओढे, नाले खळखळण्यास सुरवात झाली आहे. कुरवंडी येथील वेळेश्‍वर डोंगरावर उगम पावणाऱ्या वेळ नदी पात्रातील बंधारे भरण्यास सुरवात झाली आहे. भावडी येथील बंधारा ओसंडून वाहू लागला आहे. 

सातगावातील पारगाव, कुरवंडी, पेठ, भावडी, कुदळेवाडी, कोल्हारवाडी, थुगाव आदी गावांत पावसाने जोरदार बरसात केली आहे. कधी धुवाधार तर कधी संततधार बरसणाऱ्या पावसाने परिसरातील ओढे-नाले खळखळून वाहू लागले आहेत. परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. सतत बरसणाऱ्या पावसाने परिसरातील डोंगररांगा हिरव्यागार झाल्या असून, त्यामुळे चाऱ्याचा प्रश्‍न सुटला आहे. या भागातील मुख्य पीक असलेल्या बटाट्याची लागवड अद्यापही सुरू झाली नाही. जोपर्यंत पाऊस पूर्णपणे उघडीप देत नाही तोपर्यंत शेतांत वाफसा निर्माण होणार नाही. त्यामुळे बटाटा लागवडी रखडल्या आहेत. असे असले तरी पावसाने पाण्याचा प्रश्‍न सोडविल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com