कोल्हापुरात कोथिंबिरीच्या पेंढ्यांना शेकडा २०० ते ५०० रुपये दर

coriader
coriader

कोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात कोथिंबिरीच्या आवकेत चांगली वाढ झाली. कोथिंबिरीच्या पेंढ्यांना शेकडा २०० ते ५०० रुपये दर मिळाला. कोथिंबिरीची दररोज ४० ते ४५ हजार पेंढ्यांची आवक होत आहे. गेल्या पंधरवड्याच्या तुलनेत १५ ते २० टक्‍यांनी आवक वाढल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. 

जूनच्या अखेरपर्यत कोथिंबिरीची चणचण जाणवत असल्याने दरात मोठी वाढ झाली होती. जूनच्या शेवटच्या सप्ताहापर्यंत कोथिंबिरीचे शेकड्याचे दर ५०० ते १५०० रुपयांपर्यंत होते. गेल्या सप्ताहापासून जिल्ह्याबरोबरच परजिल्ह्यातून कोथिंबिरीची आवक वाढली आहे. मेथीच्या आवकेतही या सप्ताहात वाढ झाली होती. मेथीस शेकडा ३०० ते १००० रुपये दर होता. कोथिंबिरीच्या तुलनेत मेथीचे दर स्थिर असल्याचे भाजीपाला विभागातून सांगण्यात आले. पालक, पोकळा, शेपू पेंढीस शेकडा १०० ते ३०० रुपये दर होता. टोमॅटोस दहा किलोस ५० ते १५० रुपये दर मिळाला. टोमॅटोची दररोज दोन ते तीन हजार कॅरेटची आवक झाली. भेंडी, गवारीची आवक या सप्ताहातही वाढली होती. भेंडीस दहा किलोस ५० ते १००, तर गवारीस दहा किलोस १०० ते ३०० रुपये दर होता. ढोबळ्या मिरचीची ५०० ते ६०० पोती आवक होती. ढोबळी मिरचीस दहा किलोस २५० ते ३५० रुपये दर होता. गेल्या सप्ताहाच्या तुलनेत भेंडी, गवारीची आवक दहा ते पंधरा टक्‍यांनी वाढल्याचे फळे व भाजीपाला विभागातून सांगण्यात आले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मक्याच्या कणसाला शेकडा २०० ते ३०० रूपये
मका कणसाच्या आवकेतही या सप्ताहात वाढ झाली. या कणसांची दररोज दहा ते पंधरा हजार नग आवक झाली. मक्‍यास शेकडा २०० ते ३०० रुपय दर होता. फळांमध्ये डाळिंबांची दररोज ५०० ते १०० कॅरेट आवक होती. डाळिंबांना किलोस १० ते ५० रुपये दर होता. तोतापूरी आंब्याची दररोज चार ते पाच टन आवक झाली. तोतापुरी आंब्यांना टनास ३०००० ते ३५००० रुपये दर मिळाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com