देशातील धरणसाठा १८ टक्क्यांवर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 मे 2018

नवी दिल्ली - देशातील महत्त्वाच्या जलाशयातील पाणीसाठा घटला आहे. देशात मॉन्सून दाखल होण्याच्या मार्गावर असताना देशातील ९१ जलाशयातील पाणीसाठा हा २९.२९६ अब्ज क्युबीक मिटर आणि या जलाशयांच्या क्षमतेच्या केवळ १८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

नवी दिल्ली - देशातील महत्त्वाच्या जलाशयातील पाणीसाठा घटला आहे. देशात मॉन्सून दाखल होण्याच्या मार्गावर असताना देशातील ९१ जलाशयातील पाणीसाठा हा २९.२९६ अब्ज क्युबीक मिटर आणि या जलाशयांच्या क्षमतेच्या केवळ १८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

सध्या या जलाशयांमध्ये असलेला पाणीसाठा हा मागील वर्षाच्या पाणीसाठ्याच्या तुलनेत १६.७ टक्क्‍यांनी कमी आहे. तसेच सध्याची पाणीपातीळी ही मागील १० वर्षांतील सरासरी पाणीपातळीपेक्षा कमी आहे. उत्तर भारतातील पंजाबमध्ये सरासरीच्या ४१ टक्के कमी पाणीसाठा आहे तर राजस्थानमध्ये सरासरीच्या १७ टक्के जास्त पाणीसाठा आहे. गुजरातमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पाणीसाठा घटला असून, येथील जलाशयांमध्ये सरासरीच्या ४२ टक्के पाणीसाठी कमी आहे. तसेच उत्तर प्रदेशातील जलाशयांमध्ये सरासरी पाणीपातळीच्या २६ टक्के कमी पाणीसाठा आहे. तसेच दक्षिण भारतातील केरळ वगळता सर्वच राज्यांमध्ये सरासरी पाणीपातळीपेक्षा जास्त पाणीसाठा आहे.

मॉन्सून हंगाम २०१७-१८ मध्ये देशातील अनेक भागांमध्ये परतीच्या पावसाने पाठ फिरविली होती. परिणामी, येथील जलाशयांमध्ये पाणीसाठा मोठ्या प्रमाणात होऊ शकला नाही. तसेच रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पाणी द्यावे लागले. त्याचा परिणाम जलाशयातील साठ्यावर झाला आहे. त्यामुळे सध्याच्या स्थितीतील देशातील जलाशयांध्ये मागील वर्षीपेक्षा कमी पाणीसाठा असून सध्या १८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dam water storage 18 percentage