अॅग्रोवन वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी पुण्यात चर्चासत्र

प्रतिनिधी
रविवार, 15 एप्रिल 2018

पुणे - शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेती, ज्ञान-तंत्रज्ञान, बाजारपेठांची माहिती देत शिवारात कष्टाने फुलणाऱ्या यशोगाथा सांगत सरकार दरबारी सडतोडपणे शेतीच्या व्यथा मांडणाऱ्या ''अॅग्रोवन''च्या तेराव्या वर्धापन दिनानिमित्ताने ''जपाल माती, तर पिकतील मोती'' या विषयावर चर्चासत्र आयोजित केले आहे. पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात मंगळवारी दुपारी चार वाजता होणाऱ्या या अभ्यासपूर्ण चर्चासत्रात प्रताप चिपळूणकर, सुभाष शर्मा, वासुदेव काठे आणि डॉ. अजितकुमार देशपांडे असे मान्यवर शेतकरी आणि तज्ज्ञ शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्याचबरोबर वर्धापन दिनानिमित्त वीस एप्रिलपासून तीन दिवस विशेषांक प्रकाशित केले जाणार आहेत.

गावकुसातील शेतीचे प्रयोग आणि व्यथांपासून ते जगभरात सुरू अत्याधुनिक शेती संशोधनाची सखोल माहिती बांधावर पोचवत ग्रामविकासाचा वसा घेतलेला शेतकऱ्यांचा सच्चा मित्र ''अॅग्रोवन'' येत्या २० एप्रिल रोजी चौदाव्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्याचबरोबर ''अॅग्रोवन''ने २०१८ हे वर्ष ''जमीन सुपीकता वर्ष'' म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे जमीन सुपीकतेच्या संकल्पनेला मध्यवर्ती ठेवून पुण्यात विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे.

ॲग्रोवन जमीन सुपीकता वर्ष २०१८
 चर्चासत्र - जपाल माती, तर पिकतील मोती
 स्थळ - टिळक स्मारक मंदिर, पुणे
 दिनांक व वेळ : मंगळवार, १७ एप्रिल २०१८, दुपारी ४ वाजता

Web Title: Discussion sessions in Pune on Tuesday on the Agroon Anniversary Day