esakal | दिवाळी शेतकऱ्यांची : यंदाची दिवाळी उधारी, उसनवारीवर!
sakal

बोलून बातमी शोधा

farmer

यंदाही आम्हा शेतकऱ्यांच्या हेच पदरात पडले. यंदा नुकसानीमुळे उत्पादन ५० टक्क्यांच्या आत आले. खर्चही निघाला नाही. त्यामुळे यंदाचा दिवाळी सण उधारी आणि उसनवारीवर करावा लागत आहे...

दिवाळी शेतकऱ्यांची : यंदाची दिवाळी उधारी, उसनवारीवर!

sakal_logo
By
प्रतिनिधी

अकोला  पाऊस कमी झाला काय आणि जास्त झाला काय...दोन्हीमुळे होणार ते नुकसानच. यंदाही आम्हा शेतकऱ्यांच्या हेच पदरात पडले. यंदा नुकसानीमुळे उत्पादन ५० टक्क्यांच्या आत आले. खर्चही निघाला नाही. त्यामुळे यंदाचा दिवाळी सण उधारी आणि उसनवारीवर करावा लागत आहे... मालेगाव तालुक्यातील नंदू चव्हाण बोलत होते.

आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दिवाळीचा सण महत्त्वाचा असल्याने तो साजरा करण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहेत. एकीकडे रब्बीची लगबग, दुसरीकडे दिवाळी सण, अशा दोन्ही गोष्टी एकाचवेळी आल्याने शेतकऱ्यांची पळापळ सुरू आहे. हातात पैसा नसताना दोन्ही गोष्टी करणे गरजेच्या आहेत. यासाठी अनेक जण उधार, उसनवारी करीत दिवाळीची खरेदी करीत आहेत. शिवाय बी-बियाणे आणत आहेत. भविष्याकडे नजरा ठेवून हाही दिवस जाईल, या आशेवर ही गुंतवणूक तो करीत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नंदू चव्हाण यांना यंदा चार एकरांत २० पोती सोयाबीन झाले. हे सोयाबीन पिकविण्यासाठी तणनाशकासह चार फवारण्या केल्या. रासायनिक खत, सूक्ष्म अन्नद्रवे पिकाला घातली, तेव्हा कुठे एवढे धान्य घरात आले. आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडे एकरी क्विंटल, दीड क्विंटलच सोयाबीन पिकले. मागच्या वर्षीही अशीच स्थिती होती. चव्हाण यांना याआधी एवढ्या शेतात एकरी ९ ते १० क्विंटल उत्पादन व्हायचे. यंदा ते ५० टक्के कमी होऊन पाच क्विंटलच्या आत आले. खर्चात कुठलीही कमी नाही. उलट तो होता त्यापेक्षा अधिकच वाढला.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अकोट तालुक्यातील अनुप साबळे हे तरुण शेतकरी मागील १५ वर्षांपासून शेतीत राबत आहेत. दरवर्षी १०० एकरांपेक्षा अधिक क्षेत्राचे व्यवस्थापन ते करतात. अनुप म्हणाले, की असे वर्ष आपण गेल्या १५ वर्षांत यापूर्वी कधीही पाहले नाही. आमचा मूग या हंगामात १०० टक्के हातातून गेला. सोयाबीन एकरी तीन ते चार क्विंटल होत आहे. आम्ही १० एकर ज्वारी लावली होती. त्यात ४० क्विंटल ज्वारी झाली. आता ती ज्वारी घरी आणायचेही काम नाही. कारण मजुरीच त्यापेक्षा अधिक द्यावी लागते.