अनुदानाच्या त्रासापोटी संपविले जीवन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जानेवारी 2017

ठिबक वितरकाची आत्महत्या

राहुरी, जि. नगर (प्रतिनिधी) : दोन वर्षांपासून थकलेले ठिबक संच अनुदान, लाभार्थ्यांकडून होणाऱ्या पाठपुरवठ्याच्या त्रास आणि कर्जबाजारीपणास कंटाळून पिंपळगाव फुणगी येथील वितरकाने अात्महत्या केल्याची धक्कादायक घटना येथे घडली.

ठिबक वितरकाची आत्महत्या

राहुरी, जि. नगर (प्रतिनिधी) : दोन वर्षांपासून थकलेले ठिबक संच अनुदान, लाभार्थ्यांकडून होणाऱ्या पाठपुरवठ्याच्या त्रास आणि कर्जबाजारीपणास कंटाळून पिंपळगाव फुणगी येथील वितरकाने अात्महत्या केल्याची धक्कादायक घटना येथे घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळगाव फुणगी (ता. राहुरी) येथील ठिबकसंच वितरक प्रवरा अॅग्रो  सव्र्हीसेसचे संचालक व शेतकरी सुहास वसंत राऊत वय ५२ यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ठिबक संचाचे २०१३-१४ चे अनुदान प्रलंबित असल्याने शेतक-याकडून होत असलेल्या मानसिक छळास कंटाळून राऊत यांनी आत्महत्या केली असल्याची चिठ्ठी त्यांच्या खिशात आढळली. राऊत यांचे श्रीरामपूर येथे प्रवरा अॅग्रो सव्ह्रीसेस नावाचे दुकान आहे. त्यांनी ज्या शेतक-यांना ठिबकसंच दिले ती कंपनी आता अनुदानास पात्र नाही. त्यामुळे कर्ज काढून ठिबकसंच दिले त्यांना शासनाचे अनुदान मिळू शकत नाही हे स्पष्ट झाले. त्यातच अनुदान मिळण्यासाठी लाभार्थींचा तगादा सुरू होता.

अशातच पिंपळगाव फुणगी येथील स्वत:ची आणि नरसाळी येथे ते एका नातेवाइकाची शेती करत होते. गेली तीन वर्षे दुष्काळामुळे ती शेती तोट्यातच होती. त्यातून कर्जबाजारी व अनुदानासाठीचा तगादा यास कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. अनुदान योजनेतून त्यांनी विलास भगत (रा. बेलापूर) यांना ठिबकसंच दिला होता. मात्र ठिबकसंचाचे अनुदान प्रस्तावास शासनाची मंजुरी मिळालेली नाही. २०१३-१४ पासून वितरक वेगवेगळ्या पातळीवर हे अनुदान मिळावे म्हणून प्रयत्नरत होते. मात्र ते अद्यापही मिळालेले नाही व मिळणार नाही हेदेखील आता स्पष्ट झाले आहे. भगत यांच्‍याकडून राऊत यांच्‍याकडे सतत अनुदानाचा तगादा सुरू होता, त्यास कंटाळून आत्महत्या केल्याचे राऊत यांनी चिठ्ठीत म्हटले अाहे.

बेलापूर खुर्द येथील सोपान बदडे यांचे शेतातील शेडमध्ये लोंखडी अॅगलला गळफास घेऊन सुहास राऊत यांनी आत्महत्या केली. सुरवातीस पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता. सुहास याचे खिशातील चिठ्ठीवरून आत्महत्येचा गुन्हा दाखल केला. हर्षल राऊत याचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. सुहास राऊत यांच्‍या मागे पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. सहायक फौजदार शिवाजी पाळदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक दत्तात्रेय गव्हाणे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: farmer suicide in rahuri