पुण्यात 22 नोव्हेंबरला किसानपुत्रांचा मेळावा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 नोव्हेंबर 2016

.औरंगाबाद (प्रतिनिधी) : किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने 22 नोव्हेंबरला पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे किसानपुत्रांच्या पहिल्या राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती किसानपुत्र आंदोलनाचे अमर हबीब यांनी दिली.

.औरंगाबाद (प्रतिनिधी) : किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने 22 नोव्हेंबरला पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे किसानपुत्रांच्या पहिल्या राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती किसानपुत्र आंदोलनाचे अमर हबीब यांनी दिली.

हा मेळावा सकाळी 9 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, या हेतूने तसेच कमाल जमीन धारणा (सीलिंग), जीवनाश्‍यक वस्तू आणि जमीन अधिग्रहण हे शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरलेले तीन कायदे रद्द करावे या मागणीसाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांची मुले शिक्षण आणि रोजगारासाठी शहरात गेली आहेत. केवळ पुण्यातच लाखो किसानपुत्र आहेत. त्यांनी एकत्र जमून शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकण्याची गरज आहे.

व्यवस्था बदलल्याशिवाय शेतकऱ्यांचे प्रश्‍न सुटणार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्‍न आंदोलनाच्या माध्यमातून महानगरात नेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. किसानपुत्रांनी मनावर घेतले तर शेतकऱ्यांना खरे स्वातंत्र मिळू शकेल, असा विश्‍वास आपल्याला असल्याचे किसानपुत्र आंदोलनाचे अमर हबीब व अच्युत गंगणे यांनी सांगितले.

किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने आयोजित किसानपुत्रांच्या मेळावास्थळी साखळदंड ठेवला जाणार आहे. हा साखळदंड शेतकऱ्यांना ज्या जोखडात बांधून ठेवलेय त्याचे प्रतीक असेल. त्यामुळे मेळाव्यात सहभागी होणाऱ्या किसानपुत्रांनी या साखळदंडावर घाव घालणे अपेक्षित आहे. यामागे शेतकऱ्यांभोवतीचे जोखड तोडण्यासाठीचा प्रयत्न करणे हा उद्देश असल्याचे किसानपुत्र आंदोलनाचे अमर हबीब यांनी स्पष्ट केले.

Web Title: Farmers rally in Pune on November 22