खाद्यासाठी कीटकपालन ठरेल पर्यावरणपूरक पर्याय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

अनेक देशांमध्ये किटकांचा वापर मानवी आहारामध्ये केला जातो. अशा किटकांच्या आहारातील वापरामुळे अन्य पशुपालनाच्या तुलनेमध्ये पर्यावरणावर कमी ताण पडणार असल्याचे मत कोपेनहेगन विद्यापीठातील अभ्यासात मांडण्यात आले आहे. या किटकांचे पालन हा शाश्वत पर्याय ठरू शकतो.  

अनेक देशांमध्ये किटकांचा वापर मानवी आहारामध्ये केला जातो. अशा किटकांच्या आहारातील वापरामुळे अन्य पशुपालनाच्या तुलनेमध्ये पर्यावरणावर कमी ताण पडणार असल्याचे मत कोपेनहेगन विद्यापीठातील अभ्यासात मांडण्यात आले आहे. या किटकांचे पालन हा शाश्वत पर्याय ठरू शकतो.  

शाश्वतपणे अन्नधान्यांची उपलब्धता करण्याच्या उद्देशाने विविध प्रकारच्या खाद्यपद्धतींचा अभ्यास कोपेनहेगन विद्यापीठातील शास्त्रज्ञ करत आहेत. अनेक देशांमध्ये पोषक घटकांची पूर्तता करणाऱ्या कीटकपालनामुळे पर्यावरणावर किमान ताण पडणार असल्याचे दिसून आले आहे. थायलंडसारख्या देशामध्ये केल्या जाणाऱ्या क्रिकेट या कीटकपालन उद्योगाचे त्यांनी ब्रॉयलर कोंबड्या पालन उद्योगाशी तुलनात्मक अभ्यास केला. त्यामध्ये पर्यावरणाशी संबंधित सुमारे १५ निकषांवर आधारित ही तुलना केली आहे. त्यात स्रोतांचा वापर, जागतिक तापमानाशी सांगड आणि अधिक पोषकता यांचा समावेश आहे. या अभ्यासाविषयी माहिती देताना संशोधक अॅफ्टॉन हॅल्लोरन यांनी सांगितले, की पशुपालनामुळे पर्यावरणावर विपरित परिणाम होत आहेत. त्या तुलनेमध्ये कीटकपालन हा व्यवसाय पोषकतेबरोबरच पर्यावरणावरील ताण कमी करणारा ठरू शकेल. पोषकतेतील काही बाबीमध्ये मांस आणि मत्स्यआहाराचीही बरोबरी करण्याची क्षमता आहे. पर्यायी खाद्यामध्ये किटकांचा समावेश करण्यासाठी अधिक अभ्यासाची आवश्यकता आहे. 

महत्त्वाचे मुद्दे  

जगभरामध्ये सुमारे २००० किटकांच्या प्रजाती नियमित खाद्यामध्ये आहेत. मात्र, त्या बहुतांश जंगलातून पकडल्या जातात. सध्या ९ प्रजातींचे मानवी खाद्यासाठी पालन केले जाते.  
थायलंडमध्ये क्रिकेट फार्मिगला गेल्या वीस वर्षामध्ये सुरुवात झाली आहे. येथील उत्तरेकडील व ईशान्येकडील भागामध्ये सुमारे २० हजार फार्म आहेत. 

Web Title: Feeding insect management will be an ecological alternative