मराठवाड्यात चाराटंचाई उंबरठ्यावर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 नोव्हेंबर 2018

औरंगाबाद - एकीकडे पाणीटंचाईचे वादळ मराठवाड्यावर घोंगावत असतानाच चाराटंचाईचे संकटही हळहळू भीषण रूप धारण करण्याच्या तयारीत आहे. त्यावर उपाय म्हणून कामाला लागत नजीकच्या विदर्भातील जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे भूस शेतकरी मराठवाड्यात आणत आहेत. मिळून तिथून व मिळेल तसा चारा आणण्याचे काम शेतकरीवर्गाकडून केले जात आहे. परंतु लवकरच भीषण रूप धरू पाहणाऱ्या चाऱ्याच्या संकटावर तोडगा काढण्यासाठी शासन व प्रशासन स्तरावरून काय हालचाली होताहेत, हा प्रश्‍न आहे. 

औरंगाबाद - एकीकडे पाणीटंचाईचे वादळ मराठवाड्यावर घोंगावत असतानाच चाराटंचाईचे संकटही हळहळू भीषण रूप धारण करण्याच्या तयारीत आहे. त्यावर उपाय म्हणून कामाला लागत नजीकच्या विदर्भातील जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे भूस शेतकरी मराठवाड्यात आणत आहेत. मिळून तिथून व मिळेल तसा चारा आणण्याचे काम शेतकरीवर्गाकडून केले जात आहे. परंतु लवकरच भीषण रूप धरू पाहणाऱ्या चाऱ्याच्या संकटावर तोडगा काढण्यासाठी शासन व प्रशासन स्तरावरून काय हालचाली होताहेत, हा प्रश्‍न आहे. 

ऐरवी पडणाऱ्या दुष्काळात साधारणत: फेब्रुवारीनंतर होणारा पशुधनाचा पोटमारा नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच सुरू झाला आहे. त्यामुळे दुष्काळात होरपळणाऱ्या मराठवाड्यात चाऱ्याअभावी पशुधन संकटात आले आहे. जनावरे जगली पाहिजे, यासाठी उपलब्ध चारा पुरवून वापरण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. चाऱ्याची सोय लावावी म्हणून पैठण तालुक्‍यातील घारेगाव येथील जवळपास ५० ते ६० शेतकऱ्यांनी विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यातून जनावरांच्या सोयीसाठी सोयाबीनचे भूस आणले आहे. २०१२ च्या पशुगणनेनुसार मराठवाड्यात लहान-मोठी मिळून ४७ लाख ६१ हजार ८८४ जनावरे आहेत. त्यामध्ये लहान ११ लाख ३६ हजार ३९४, तर मोठी ३६ लाख २५ हजार ४९० जनावरांचा समावेश आहे. जनावरांच्या संख्येचा विचार करता प्रतिदिवस २५ हजार १६२ टन चारा लागतो. खरिपातील चारापिकांच्या काढणीनंतरच्या आकडेवारीनुसार ६४ लाख ७५ हजार ११२ मे.िट्रक टन चारा उपलब्ध आहे. 

खरीपपूर्व आढावा बैठकीच्या अहवालानुसार त्या वेळी उपलब्ध चारा हा ५३ लाख ५३ हजार मे.िट्रक टन एवढा होता. दर दिवशी लागणारा चारा पाहता किमान २३० दिवस पुरेल एवढाच चारा मराठवाड्यात उपलब्ध होता. त्यापैकी काही दिवस आता मागे पडले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात २५२ दिवस, जालना १३४ दिवस, परभणी १४९ दिवस, बीड १६५ दिवस, लातूर २७३ दिवस, उस्मानाबाद २०२, नांदेड ३०२ दिवस, हिंगोली जिल्ह्यात ३६३ दिवस पुरेल एवढा चारा आहे. केवळ नांदेड व हिंगोली जिल्ह्यातच उपलब्धतेच्या तुलनेत जून २०१९ पर्यंत आवश्‍यक चाऱ्यात तूट नाही. उर्वरित औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, उस्मानाबाद या पाच जिल्ह्यांत जूनपर्यंत आवश्‍यक असलेल्या चाऱ्याच्या तुलनेत जवळपास पावणेचौदा लाख मे.िट्रक टन चाऱ्याची तूट आहे. 

औरंगाबाद, जालना, बीड आणि परभणी या चार जिल्ह्यांत चाराटंचाईचे संकट जास्त उग्र आहे. उपलब्ध चारा संपण्यापूर्वी शासनाने चाऱ्याची उपलब्धता व्हावी म्हणून तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. अन्यथा नाइलाजाने शेतकऱ्यांना दावणीची जनावरे आठवडे बाजारात नेण्याशिवाय पर्याय उरणार नाही. 

चारा‘बाणी’मुळे मनाई 
औरंगाबाद जिल्ह्यात या वर्षी सरासरीच्या ५३ टक्के एवढे पर्जन्यमान झाले. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्‍यांत गंभीर दुष्काळ जाहीर झाला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये भविष्यात चाराटंचाई भासण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील उत्पा.िदत चारा जिल्ह्यातील पशुधनास पुरेसा उपलब्ध व्हावा, या दृष्टीने जिल्ह्यातून परजिल्ह्यात / परराज्यात होणाऱ्या चारा वाहतुकीस फौजदार प्र.िक्रया संहिता १९७३ चे कलम १४४ (२) नुसार प्रशासनाकडून मनाई करण्यात आली आहे. तसे नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

जवळ बारा-तेरा जनावरं. त्यात काही दुभती. यंदा खरिपाचे पीक हातचे गेले. घासही पाण्याअभावी सोडून द्यावा लागला. आता लोणी गवळी, जि. बुलडाणा येथून दोन कॅंटर सोयाबीन भूस ३० हजार खर्चून आणलं. ते फार तर महिनाभर पुरंल. त्यानंतर पैसे अन्‌ चाऱ्याचा प्रश्न पुन्हा उभा राहील. शासनानं तातडीनं दावणीला चाऱ्यासाठी मदत देण्याची करावी. नसता जनावरं कवडीमोल दरानं विकावी लागतील. शिवाय जमिनीसाठी त्यांची गरज असल्यानं पुन्हा ती मिळणारही नाहीत. 
- प्रभाकर थोरे, घारेगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद.

Web Title: Fooder Shortage Water Drought