दिवसातून आठ वेळा खा भाज्या आणि फळे 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 मार्च 2017

भाज्यांचा आहारात वापर असला पाहिजे, याविषयी बहुतेक सर्व वैद्यकीय तज्ज्ञांचे एकमत असले तरी त्यांचे नेमके प्रमाण आहारात किती असावे, याचा अभ्यास नॉर्वे येथील संशोधकांनी केला आहे. त्यांनी जगभरातील अग्रगण्य ९५ संशोधनपत्रिकेतील सुमारे १४२ संशोधनांचा एकत्रित अभ्यास केला आहे. त्याचे निष्कर्ष इंटरनॅशनल जर्नल ऑफ एपिडेमिओलॉजी मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. 

नॉर्वेयन शास्त्र आणि तंत्रज्ञान विद्यापीठातील संशोधक डॅगफिन औने आणि इंपिरीअल कॉलेज लंडन येथील संशोधकांनी केलेल्या अभ्यासामध्ये हृदयरोगांचा धोका टाळण्यासाठी आहारामध्ये सुमारे ८०० ग्रॅम भाज्या व फळांचा समावेश आवश्यक असल्याचे दिसून आले आहे. आजवर पाचवेळा विभागून भाज्या किंवा फळे खाण्याविषयी सांगितले जात असले तरी नेमका आकडा हा आठ असल्याचे संशोधकांनी सांगितले. 

भाज्या व फळांचे योग्य प्रमाण आहारात ठेवल्यास जगभरातील ७.८ दशलक्ष लोकांमध्ये असलेला हृदयरोग, पक्षाघात, कर्करोग आणि अपमृत्यूचा धोका टाळणे शक्य होणार आहे. 

Web Title: fresh vegetable & fruits

टॅग्स