निर्यातक्षम द्राक्ष नूतनीकरण, नोंदणीकडे शेतकऱ्यांची पाठ

greps
greps

सांगली - जिल्ह्यातील तासगाव पूर्व, खानापूर तालुक्‍यांत अत्यल्प प्रमाणात पाऊस झाला. यामुळे पाण्याची टंचाई कायम आहे. पाणीटंचाईवर मात करून जिल्ह्यातील द्राक्षाची निर्यात करण्यासाठी शेतकरी पुढे आले आहेत. मात्र, जत, मिरज, कडेगाव, तासगाव या तालुक्‍यांतून नवीन नोंदणीसह नूतनीकरण करणाऱ्या द्राक्ष उत्पादकांनी पाण्याच्या टंचाईने पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातून डिसेंबरच्या पहिल्या सप्ताहापर्यंत १०२९ शेतकऱ्यांनी नवीन आणि नूतनीकरण केले आहे. मात्र, जोपर्यंत निर्यातक्षम द्राक्षाचा हंगाम सुरू होत नाही तोपर्यंत जिल्ह्यातून किती द्राक्षांची निर्यात होणार आहे, याबाबत साशंकता व्यक्त होते आहे. 

जिल्ह्यातील आटपाडी, जत, तासगाव पूर्व भाग, खानापूर तालुक्‍यांत मॉन्सून व परतीचा पाऊस संख्या अत्यल्प झाला. यामुळे पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. पाण्याची टंचाई असली तरी शेतकऱ्यांनी निर्यातक्षम नोंदणीसाठी पुढे आले आहेत. खानापूर तालुक्‍यात पहिल्यापासूनच पाण्याची टंचाई होती, त्यामुळे या तालुक्‍यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी टॅंकरद्वारे पाणी देऊन द्राक्ष बागा जगवल्या आहेत. या तालुक्‍यातून या वर्षी द्राक्षाची निर्यात करण्यासाठी निर्यातदारांची ६५० इतकी आहे. पलूस तालुक्‍यात निर्यातक्षम द्राक्षाचे १८.०२ हेक्‍टरने वाढ झाली आहे. तासगाव तालुक्‍यातूनही द्राक्षाची निर्यात करण्यासाठी शेतकरी पुढे येत आहेत. जिल्ह्यातील डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात १०२९ द्राक्ष उत्पादकांनी नवीन आणि द्राक्ष निर्यातीचे नूतनीकरण केले असले तरी क्षेत्रात ३२ हेक्‍टरने घट झाली आहे. 

११०० उत्पादक करतील नोंदणी 
गतवर्षी १ हजार ८१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. मात्र, यंदा पाऊस कमी झाल्याने पाण्याची टंचाई असल्याने निर्यातक्षम द्राक्षाची नोंदणी कमी होण्याची भीती कृषी विभागाने व्यक्त केली होती. मात्र, डिसेंबरअखेरपर्यंत ११०० द्राक्ष उत्पादक शेतकरी नोंदणी करतील, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. 

तालुका निहाय द्राक्षाची नोंदणी क्षेत्र (हेक्‍टरमध्ये) 
तालुका.....नवीन नोंदणी.... नूतनीकरण....शेतकरी....क्षेत्र 
आटपाटी....१४....९...१९....११.६५ 
जत....०.......९........९.....९.०० 
कडेगाव....२....१....३.....१.६२ 
कवठेमहांकाळ....३....४....७....३.२१ 
खानापूर.....२३५....४१५..६५०...३१९.३६ 
मिरज.....३३....७....४०....२८.५२ 
पलूस.....५५....४....५९....३४.४३ 
तासगाव.....९१.....१५१....२४२....१२५.५६ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com