तुम्ही तांदूळ कसा शिजविता....?

वृत्तसंस्था
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

बेलफास्ट - भारतात पूर्वापार भात हे प्रमुख अन्न मानले जाते. सामान्य घरात तर भाताशिवाय एक दिवसही स्वयंपाक पूर्ण होत नसेल. भाताचे विविध प्रकार भारतातच नाही तर भारताबाहेरही लोकप्रीय आहेत. परंतु, आपली तांदूळ शिजविण्याची पद्धत योग्य आहे का..? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

इंग्लंडमधील क्वीन्स यूनिव्हरसिटी बेलफास्टच्या संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, वाढत्या पेस्टिसाईडच्या वापराने तांदऴात आर्सेनिकचे प्रमाण वाढल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे पारंपारिक पद्धतीने आपण जसा तांदूळ शिजवतो ती पद्धत धोकादायक असल्याचे समोर आले आहे. 

क्वीन्स यूनिव्हरसिटीचे ऍण्डी मेहर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्सेनिकच्या वाढलेल्या प्रमाणामूळे डायबेटिस, कर्करोग किंवा हृदयविकार होण्याची शक्यता असते. यासाठी तांदूळ रात्रभर भिजत घालून सकाळी तो शिजविण्याचा सल्ला मेहर्ग यांनी दिला आहे. रात्रभर तांदूळ भिजविल्याने त्यातील टॉक्झिन्स पाण्यात उतरतात. हे पाणी काढून टाकल्यावर चांगल्या पाण्यात भात शिजवावा, ही उत्तम पद्धत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.  

Web Title: Have We Been Cooking Rice The Right Way