पुणे : जिल्ह्यात एक लाख हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या

भोर तालुक्यात सर्वाधिक प्रमाण
खरिप हंगाम
खरिप हंगामsakal

पुणे : पुणे जिल्ह्यात (pune district) जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत १ लाख २ हजार ४६२ हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पेरण्यांचे हे प्रमाण सरासरी खरीप क्षेत्राच्या तुलनेत ५५.६० टक्के एवढे आहे. यामध्ये भोर तालुक्याने आघाडी घेतली असून, या तालुक्यात सर्वाधिक १२ हजार ८७९ हेक्टरवर खरीप पेरण्या झाल्या आहेत. (Kharif sowing area ​​one lakh hectares pune district)

जिल्ह्यातील काही भागात मे महिन्याच्या अखेरीपासून पाऊस सुर झाला होता. हा पाऊस जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत होता. त्यानंतर मात्र अगदी जुलैच्या महिन्याच्या मध्यापर्यंत पावसाने उघडीप दिली होती. या उघडिपीच्या काळात या पेरण्या पूर्ण झाल्या असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले.

खरिप हंगाम
तरुणामुळं ट्रॅफिकचा खेळखंडोबा! कारण ऐकून थक्क व्हाल

जिल्ह्याचे उसाचे क्षेत्र वगळता खरीप पिकाचे सरासरी क्षेत्र हे १ लाख ८४ हजार २७३ .७८ हेक्टर इतके आहे. यापैकी १ लाख २ हजार ४६२ हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात खरिपाचे सर्वाधिक ३१ हजार २५५ हेक्टर क्षेत्र हे जुन्नर तालुक्यात असून, सर्वात कमी म्हणजे ३ हजार १३७ हेक्टर क्षेत्र हे दौंड तालुक्यात आहे. खरीप हंगामात पुणे जिल्ह्यात भात, खरीप ज्वारी, बाजरी, रागी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, तीळ, कारळे, सूर्यफूल, सोयाबीन आदी प्रमुख पिके घेतली जातात.

खरिप हंगाम
पुणे : दहशत पसरविणाऱ्या गुंडाविरुद्ध कारवाई

दरम्यान, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्यावतीने खरीप हंगामातील पिकांसाठी सुमारे दीड हजार कोटी रुपयांचे पीक कर्जवाटप केले आहे. तीन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज हे शून्य टक्के व्याजाने वितरित करण्यात येत असल्याचे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी सांगितले.

खरिपाचे सरासरी व पेरणी झालेले क्षेत्र (हेक्टरमध्ये)

तालुका सरासरी क्षेत्र पेरणी पूर्ण झालेले क्षेत्र

हवेली ४९११.८८ १८७९.६५

मुळशी ८७७१.८६ १४८९.२७

भोर १४६४३ १२८७९

मावळ १२३१०.६० ३६६

वेल्हे ५९९४.२७ १६८८.५८

जुन्नर ३१२५५.०७ १६६६३

खेड २३६१९.९० १५३५८.६५

आंबेगाव १८५८२.८० ५०२६.१०

शिरूर २७४३२.५४ १८३८०

बारामती १०२८०.९४ १२४४७

इंदापूर ७७८३.०७ ३०४४.४०

दौंड ३१३७.३७ ३२१८.३०

पुरंदर १५५५०.४८ १००२२.३३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com