खिलार बैलांच्या किमतीत दीडपट ते दुप्पट वाढ

राजकुमार चौगुले
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - बैलगाडा शर्यतबंदीचा निर्णय मागे घेण्याच्या निर्णयावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्यानंतर खिलार बैलांच्या किमती गेल्या आठ ते दहा दिवसांत दीडपट ते दुप्पट वाढल्या आहेत. अद्याप शासकीय आदेश प्राप्त झाला नसला तरी स्वाक्षरी केल्यानंतर शर्यत शौकिनांत प्रचंड उत्साह संचारला आहे. शर्यतीवर बंदी आल्याने गेल्या सहा महिन्यांत खिलारच्या किमती चिंताजनक स्वरूपात घसरल्या होत्या. ज्या बैलजोड्या चार पाच लाख रुपयांना विकत घेतल्या त्या बैल जोड्या काही हजारांत देऊन नुकसान सोसावे लागत होते.
 
गणेशोत्सवाचा धुरळा शर्यतीने उडणार?

स्वाक्षरी झाल्यानंतर खिलार शौकिनांनी बैलांच्या आहारातही वाढ करून त्यांना शर्यतीच्या दृष्टीने तयार करण्यासाठी प्रयत्न सुुरू केले. गावोगावी सुने असणारे कच्चे रस्ते आता बैलांच्या सरावाच्या धुळीने माखत आहेत. बैलबाजारात तेजी आली आहे. खिलार संगोपनाची रया गेलेल्या शर्यतीच्या शौकिनांना स्वाक्षरीच्या वृत्ताने जोम आला आहे. राष्ट्रपतींच्या मान्यतेनंतर शर्यतीवर आता बंदी येण्याची शक्‍यता धूसर असल्याचे गृहीत धरून शर्यती आयोजकांनी शर्यती ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. गणेशोत्सव तोंडावर आल्याने अनेक मंडळांनी शर्यतीच्या आयोजनासाठी उत्सुकता दाखविली आहे. शर्यती ठेवण्याची परंपरा असणाऱ्या मंडळांनी लाखो रुपयांच्या बक्षिसाच्या शर्यतीची तारीख ठरविली आहे. पण शासकीय आदेश आल्यानंतरच या शर्यती होतील, अन्यथा तारखेत बदल हातील, असे मंडळांनी शौकिनांना कळविले आहे. ज्या दिवशी आदेश येईल त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून धुरळा उडणार असल्याने त्याची तयारी बैलमालकांनी आतापासूनच करण्यास सुरवात केली आहे.

 दीड लाखाचा बैल गेला साडेचार लाखांवर
दरवाढीच्या वृत्ताला दुजोरा देताना शिवाजीनगर (जि. सांगली) येथील शर्यतीचे शौकिन हेमंत कराडे यांनी सांगितले की राष्ट्रपतींची स्वाक्षरी होण्याअगोदर एका मित्राचा बैल दीड लाख रुपयांना ठरविला होता. परंतु स्वाक्षरी झाल्यानंतर याच बैलाची किंमत साडेचार लाखांपर्यंत गेली. शेवटी या किमतीलाच बैलाची विक्री झाली. गेल्या दहा ते बारा दिवसांच्या कालावधीत ज्या ज्या ठिकाणी आठवडा बाजार झाला त्या त्या ठिकाणी किमतीत वाढ झाल्याचे बाजार समित्यांच्या सूत्रांनी सांगितले.

Web Title: kolhapur news agrowon

टॅग्स