कोल्हापुरात कांद्याचे दर वाढलेलेच

कोल्हापुरात कांद्याचे दर वाढलेलेच

कोल्हापूर  - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात कांद्याच्या दरात तेजी कायम राहिली. सप्ताहात कांद्याची २०२७६  क्विंटल इतकी आवक झाली. कांद्यास क्विंटलला ४०० ते २८०० ते १४५० रुपये इतका दर मिळाला. गेल्या सप्ताहात हीच आवक २४ ४९६ क्विंटल इतकी होती. गेल्या सप्ताहाच्या तुलनेत या सप्ताहात सरासरी चार हजार क्विंटलने आवक घटल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. गेल्या सप्ताहात कांद्यास क्विंटलला २०० ते १३०० रुपये इतका दर होता. या तुलनेत या सप्ताहात कांद्याच्या दरास क्विंटलला १०० ते २०० रुपयांची वाढ कायम होती. 

नगर, पुणे जिल्ह्यातून कांद्याची आवक होत आहे. मध्य प्रदेशातूनही कांद्याची आवक होत असली तरी आवकेचे प्रमाण कमी झाल्याचे कांदा बटाटा विभागातून सांगण्यात आले. बटाटाच्या आवकेतही गेल्या सप्ताहाच्या तुलनेत एक हजार क्विंटललने घट झाली. बटाट्यास क्विंटलला ५०० ते १००० रुपये दर होता. दर मात्र स्थिर आहे.

लसणाच्या आवकेत 
चांगली वाढ होती. गेल्या सप्ताहात लसणाची २६२ क्विंटल आवक होती. या सप्ताहात ती ६१४ क्विंटल इतकी झाली. लसणास क्विंटलला २५०० ते ५००० रुपये इतका दर मिळाला. 

भाज्यांमध्ये टोमॅटोचे दर समाधानकारक होते. टोमॅटोस क्विंटलला २००० ते ४००० रुपये इतका दर मिळाला. गेल्या सप्ताहाच्या तुलनेत टोमॅटोची आवक काहीशी वधारली. या सप्ताहात दररोज दोन ते अडीच हजार कॅरेटची आवक होती. गेल्या सप्ताहाच्या तुलनेत या सप्ताहात टोमॅटोचे दर स्थिर असल्याची माहिती भाजीपाला विभागातून देण्यात आली. ओली मिरचीस क्विंटलला २५०० ते ४००० रुपये दर मिळाला. फळांमध्ये अंजिराच्या आवकेस सुरवात झाली आहे. अंजिरास किलोस ५० ते ८० रुपये इतका दर मिळाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com