अॅग्रोवन समृद्द शेती बक्षीस योजनेच्या प्रचाराचा शुभारंभ

दिगंबर पाटोळे
बुधवार, 31 ऑक्टोबर 2018

वणी (नाशिक) : दैनिक ‘‘अॅग्रोवन" च्या माध्यमातून नवनवीन शेतीविषयक तंत्र, प्रयोग, बाजार आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय माहिती शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचत अाहे. आधुनिक शेतीसाठी अग्रोवन मार्गदर्शक म्हणून कार्य बजावत असून शेतकरी बांधवांनी 'अॅग्रोवनच्या समृद्द शेती बक्षीस योजनेत सहभागी होण्याचे आवाहन वणी मर्चंट बँकेचे संस्थापक व जेष्ठ संचालक सहकार महर्षी किसनलाल बोरा यांनी केले आहे. 

दैनिक अॅग्रोवन आयोजित समृद्द शेती बक्षिस योजनेच्या प्रचाराची सुरुवात मंगळवारी, ता. ३० येथील फर्टिलायजर मार्केट येथे किसनलाल बोरा यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी नाशिक अॅग्रो डिलर असोसिएशनच्या (नाडा) विभागीय अध्यक्ष तथा कृषी उद्योजक  महेंद्र बोरा, फर्टिलायझर असोसिएशनचे भास्कर फुगट, महेंद्र मोरे, कैलास जाधव, अतुल पताडे, कैलास जाधव आदीसह शेतकरी बांधव उपस्थित होते. यावेळी महेंद्र बोरा यांनी  अग्रोवन हा ‘‘शेती माहिती आणि संवादाचा सर्वांगसुंदर असा स्रोत असल्याचे सांगीतले तर भास्कर फुगट यांनी अॅग्रोवनमुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी दिशा व प्रेरणा मिळत असल्याचे सांगीतले. यावेळी उपस्थित सर्वांनी अॅग्रोवनच्या समृध्द बक्षीस योजनेस शुभेच्छा दिल्या. यावेळी अॅग्रोवनचे प्रतिनिधी विलास गरुड यांनी बक्षीस योजनेची माहिती दिली. प्रचार शुभारंभ कार्यक्रमाचे संयोजन बातमीदार दिगंबर पाटोळे यांनी केले.

अशी आहे बक्षीस योजना
1 नोव्हेंबर २०१८ ते 10 फेब्रुवारी 2019 या शंभर दिवसांच्या कालावधीत शंभर कुपन्स अॅग्रोवन मध्ये प्रसिद्ध केले जाणार आहेत. त्यापैकी फक्त पंचात्तर कुपन्स प्रवेशिका तक्त्यावर चिकटविणे आवश्यक आहे. प्रवेशिकेचा तक्ता 15 ते 21 नोव्हेंबर दरम्यान च्या अंकात प्रसिद्ध होणार आहे. सर्व वयोगटांसाठी ही स्पर्धा आयोजित केलेली असून या स्पर्धेत 30 लाख रुपये किमतीची 1738 बक्षिसे आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Launch of campaign for Agrowon Samriddhi Agricultural Award Scheme