तापमान आणखी घटण्याची चिन्हे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 डिसेंबर 2016

पुणे- चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाल्याने मध्य भारतातील तापमान १ ते ३ अंशसेल्सिअसने घटण्याचा हवामान विभागाचा अंदाज कायम आहे. पुढील पाच दिवस (ता.२१पर्यंत) गाेव्यासह संपूर्ण राज्यातील हवामान काेरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात सर्वांत कमी ९.८ अंशसेल्सिअस तापमान गाेंदिया येथे नाेंदले गेले.

शनिवार (ता.१७) पर्यंतच्या गेल्या २४ तासांत विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे, तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. तसेच काेकण गाेवा व मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ, तर विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास हाेते.

शनिवार (ता.१७) पर्यंतच्या गेल्या २४ तासांत राज्याच्या विविध भागांत नाेंदलेले किमान तापमान अंशसेल्सिअसमध्ये पुढीलप्रमाणे
मुंबई २५.२, अलिबाग २२.६, रत्नागिरी २२.८, पणजी २३.९, डहाणू २२.२, भिरा २२.५, पुणे १६.२, नगर १३.१, जळगाव १२.६, काेल्हापूर १९.६, महाबळेश्‍वर १५.८, मालेगाव १५, नाशिक १४, सांगली १७.९, सातारा १७.४, साेलापूर १७.२, आैरंगाबाद १६, परभणी १४, नांदेड १५.५, अकाेला १४.३, अमरावती १२.८, बुलडाणा १५.८, ब्रह्मपुरी १२.९, गाेंदिया ९.८, नागपूर ११, वाशीम १७, वर्धा १२.५, यवतमाळ १४.

Web Title: maharashtra temperature