माजलगाव परिसरात ज्वारीचे क्षेत्र घटले

वृत्तसंस्था
सोमवार, 30 जानेवारी 2017

माजलगाव -  तालुक्‍यात मोठ्या प्रमाणावर ज्वारीचे पीक घेण्यात येते; मात्र या वर्षी ज्वारीचे क्षेत्र घटून, शेतकऱ्यांनी गहू, कांदा, हरभरा पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणावर केली आहे. 

माजलगाव -  तालुक्‍यात मोठ्या प्रमाणावर ज्वारीचे पीक घेण्यात येते; मात्र या वर्षी ज्वारीचे क्षेत्र घटून, शेतकऱ्यांनी गहू, कांदा, हरभरा पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणावर केली आहे. 

दरम्यान गहू, कांदा, हरभरा या पिकांमुळे ज्वारीच्या कोवळ्या दाण्यांचा आस्वाद घेण्यासाठी येणारे विविध जातींचे पक्षी व त्यांचे थवे आज दिसत नाहीत. ज्वारीचा हंगाम समजून येणारी विविध पक्ष्यांचे थवे आज परिसराला फेरफटका मारून जणू निराश होऊन जातात की काय, असे चित्र आहे. आज बेभरवाशाचा झालेला पाऊस, सततचा दुष्काळ, अवेळीच्या पावसामुळे शेतकरी अन्य पिकांकडे वळले आहेत. याचा फटका शेतकऱ्यांबरोबर पशू- पक्ष्यांनाही बसताना दिसतो आहे. यावर्षी मका, सोयाबीनची मोठी लागवड झाली.

परतीच्या पावसाने सोयाबीनची फुलगळ झाली. पुन्हा फलधारणा होऊन शेंगा उशिरा आल्या. पर्यायाने उशिरा सोयाबीन काढणीस आल्याने ज्वारी पिकाचा हंगाम गेला. पर्यायाने शेतकऱ्यांनी हमखास येणाऱ्या व कडबा, ज्वारीचे पैसे देणाऱ्या पिकांऐवजी गहू, कांदा, हरभरा या पिकांची पेरणी केली आहे. दरम्यान ज्वारीचे क्षेत्र घटल्याने पशुधनासाठी आवश्‍यक असणारा कडबा महाग होण्याची शक्‍यता आहे. 
 

Web Title: Majalgaon farmers reduced jowar farming