मराठवाड्याचा केशर पाडाला

संतोष मुंढे
सोमवार, 22 मे 2017

औरंगाबाद : चव, गुण व गंधाने सर्वांना मोहीत करणारा मराठवाड्याचा केशर आंबा पाडाला आला आहे. आठवडाभरानंतर मराठवाड्याच्या बहुतांश बाजारात केशर आंब्याचे आगमन होण्याची शक्यात असल्याचे उत्पादकांनी सांगितले.

मराठवाड्यात जवळपास वीस हजार हेक्‍टरवर केशर आंब्याचे क्षेत्र विस्तारले आहे. औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, बीड, जालना जिह्यात बागांचा विस्तार आहे. दुसरीकडे केशर आंब्याला मिळालेल्या 'जीआय' मुळे यंदा गोडीत भरच पडली आहे. याआधी मराठवाड्याला ''केशर झोन'' म्हणून स्थान मिळवून देण्यात 'केशर आंबा उत्पादक संघ' ने महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती. 

सुरवातीच्या काळात औरंगाबादसह बीड जिल्ह्यातही केशरची मोठ्या प्रमाणात लागवड झाली होती. २००४ पर्यंत लागवडीसंदर्भातील ही रूची कायम होती. २००४ नंतर बदलत्या हवामानाच्या परिणामाबरोबरच दुष्काळाच्या झळांनी केशर आंबा लागवडीला ब्रेक लागला होता. लागवडीखालील क्षेत्र न वाढल्याने आणि सतत नैसर्गिक आपत्तीने केशरच्या बागा असलेल्या शेतकऱ्यांचा हिरमोड झाला, परिणामी संघाचा कार्यविस्तार थांबला होता. आता मराठवाड्याच्या केसरला जीआय मानांकन मिळाल्याने बागांचा विस्तार होण्याची शक्यता आहे. तसेच पोषक वातावरणामुळे निर्यातक्षम उत्पादन होऊन रखडलेली निर्यात सुरू होण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. 

ज्या आंबा उत्पादकांना आंब्याला ऑगस्ट-सप्टेंबरमधील फूट सांभाळणे शक्‍य झाले त्यांचा आंबा कदाचित याआधीच बाजारात डेरेदाखल झाला असेल. मध्यंतरी झालेली फळगळ वगळता यंदा आंबा उत्पादनासाठी पोषक वातावरण राहिले. आता पक्‍व आंबा पाडाला येणे सुरू झाल्याने केवळ वादळ व गारपिटीचा धोका वगळता कोणताही धोका नाही. गतवर्षीच्या तुलनेत बहुतांश उत्पादकांना यंदा जवळपास ६० ते ७० टक्‍के उत्पादन होईल, असे आंबा उत्पादकांनी सांगितले. सरसकट बागांचा विचार करता नेहमी मे च्या दुसऱ्या पंधरवड्यातच साधारणपणे बाजारात दाखल होणाऱ्या मराठवाड्याच्या केशरची चव आता २५ मे नंतर चाखायला मिळणार हे स्पष्ट आहे. 

शंभर झाडांच्या माझ्या बागेतील केशर पाडाला आला आहे. नैसर्गीकरित्या पिकवून साधारणपणे २५ तारखेनंतर बाजारात विक्रीसाठी येईल. गतवर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादन दुपटीने होण्याची आशा आहे. 
- मिठूभाऊ चव्हाण, केशर आंबा उत्पादक, भांडेगाव, जि. औरंगाबाद. 

दोनशे झाडांच्या माझ्या आंबा बागेतील फळं पाडला आली आहेत. साधारणपणे आठवडाभरात ती काढली जातील. गळीचा फटका मोठा बसला, त्यामुळे उत्पादनाची जी आशा होती तिला थोडा धक्‍का बसला.
- अशोक साखळे, आंबा उत्पादक, लिहाखेडी, ता. सिल्लोड 

यंदा आंब्याचा मोहर चांगला होता. पण मध्यंतरी तापमानातील चढ उताराने गळीचे प्रमाण वाढले होते. त्याचा फटका बसला आहेच. परंतु, यंदा उत्पादन अपेक्षेच्या तुलनेत चागलेच म्हणाव लागेल.
- संजय मोरे, आंबा उत्पादक, नळविहिरा, ता. जाफ्राबाद, जि. जालना.

Web Title: Marathwada's Saffron Mango