बाजार ठप्पच!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

५००, १००च्या नोटाच नाहीत; ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम

पुणे - ५०० व १००० च्या नोटा बदलानंतर राज्यात कापूस, संत्रा आदी फळे, भाजीपाला आणि फळभाज्यांच्या व्यवहारात अजूनही सुधारणा झालेली नाही. ५००, १०० चे रोख चलन आणि पेमेंटच्या चिंतेने सतावलेल्या बाजार व्यवस्थेने स्वत:च शांत राहण्याचे ठरविले आणि शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. शेती कामांचा यामुळे मोठा खोळंबा झाल्याने शेतकऱ्यांत तीव्र नाराजी आहे. अनेक ठिकाणी नफेखोरांकडून दर पाडून मागण्याचे प्रमाणही वाढले आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी ५०० व १००० च्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयाला आज सात दिवस होत आहेत. दिवसागणिक शेतकऱ्यांचे थेट नुकसान वाढतच चालल्याने चिंताही वाढली आहे. अद्यापही अनेक भागांतील बॅंकांच्या शाखेमध्ये बदली चलन उपलब्ध नाही. शेतकऱ्यांना याकरिता शहरात चकरा माराव्या लागत असून, येथेही अगोदरच गर्दी आणि चलनातील मर्यादेने त्रास वाढला आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेवर चांगला परिणाम दिसू लागला असून, शेतकऱ्यांच्या हतबलतेत वाढ झाली आहे.

असे होत आहेत परिणाम...

नोटा रद्दमुळे बाजार समित्यांत शुकशुकाट
कापूस व्यवहार थांबल्याने कोट्यवधींचे व्यवहार ठप्प
शेतकऱ्यांना लुटण्याच्या प्रमाणातही वाढ
बाजार समित्यांकडून ‘वाट पाहा’चीच भूमिका
कृषी निविष्ठांचा बाजार थंडावला
मजुरांअभावी शेतीकामेही रोडावली
काढणी, लावणी, पेरणी, विक्री खोळंबली

Web Title: market stop