व्यवस्थापन बदलाद्वारे वाढविले दुग्धोत्पादन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मार्च 2017

- म्हाळुंगेच्या दळवी कुटुंबीयांचा प्रयोग 
- तीन लिटर देणारी देशी गाय देतेय १० लिटर दूध 

कोल्हापूर : देशी गायींच्या प्रत्येक वेताला आहारात वेगवेगळे प्रयोग करीत कोल्हापूर जिल्ह्यातील म्हाळुंगे (ता. गगनबावडा) येथील सतीश दळवी यांनी गायीचे दुग्धोत्पादन वाढविले आहे. त्यांच्याकडे असणाऱ्या दोन गायींच्या दुग्धोत्पादनात त्यांनी लक्षणीय वाढ केली आहे. दिवसाला तीन लिटर दूध देणारी एक गाय आता दहा लिटरपर्यंत दूध देत आहे. तर दुसरी सहा लिटरपर्यंत दूध देत आहे. 

- म्हाळुंगेच्या दळवी कुटुंबीयांचा प्रयोग 
- तीन लिटर देणारी देशी गाय देतेय १० लिटर दूध 

कोल्हापूर : देशी गायींच्या प्रत्येक वेताला आहारात वेगवेगळे प्रयोग करीत कोल्हापूर जिल्ह्यातील म्हाळुंगे (ता. गगनबावडा) येथील सतीश दळवी यांनी गायीचे दुग्धोत्पादन वाढविले आहे. त्यांच्याकडे असणाऱ्या दोन गायींच्या दुग्धोत्पादनात त्यांनी लक्षणीय वाढ केली आहे. दिवसाला तीन लिटर दूध देणारी एक गाय आता दहा लिटरपर्यंत दूध देत आहे. तर दुसरी सहा लिटरपर्यंत दूध देत आहे. 

गेल्या पाच वर्षांत गायीच्या आहार व व्यवस्थापनात चिकित्सक बदल केल्यानेच दुधाचे प्रमाण वाढले आहे. केवळ दुग्धोत्पादनच न वाढता गायीचे फॅटही ८.५ पर्यंत गेले आहे. दळवी दांपत्याने व्यवस्थापनात बदल करून देशी गाय ही दुग्धोदपानात फायदेशीर होऊ शकते हे दाखवून दिले आहे. म्हाळुंगे येथे सतीश व पैर्णिमा हे कुटुंब राहाते. मूळचे बारामतीचे असलेले हे कुटुंब पाच वर्षापूर्वी येथे रहाण्यास आले. त्यांना देशी गायी पालनाचा अनुभव होता. येथे आल्यानंतर त्यांनी देशी गायी घेण्यासाठी शोध घेतला. पाच वर्षापूर्वी त्यांनी पाच हजार रुपयांमध्ये कोकणगिड्ड या बुटक्‍या कमी दूध देणाऱ्या गायी घेतल्या. सुरवातीला एक गाय घेतली. तिचे दूधही तीन लिटरच होते. 

प्रत्येक वेताला आहारात बदल 
ज्यावेळी त्यांनी गाय घेतली त्याच वेळी त्यांनी दिवसभर आहार दिला. सकाळ व संध्याकाळी मिळून ३० किलाे हिरवा चारा, हत्ती घास, मका, ६ किलो कोरडे गवत देत असत. गोळी पेंडही दिली जात असे. एक वेत होईपर्यंत हाच क्रम ठेवला. दुसऱ्या वेताला गोळी पेंड भुसा बंद केला. शेतकऱ्यांकडून भात, नाचणी, मका, गहू, शतावरी आदी धान्य खरेदी केले. ते धान्य भिजवायचे. त्याला मोड आणायचे. ते दळायचे आणि दळून एका वेळेला दोन किलोपर्यंत द्यायचे असा क्रम ठेवला. पुढे हे प्रमाण चार किलोपर्यंत वाढविले. यानुसार चाऱ्याचे प्रमाणही कमी केले. याचा सकारात्मक परिणाम गायीच्या आरोग्यावर झाला. दुसऱ्या गायीलाही असेच प्रमाण ठेवले, यामुळे पहिली गाय (मोठी) सहा लिटरपर्यंत तर दुसरी गाय (छोटी) चार लिटरपर्यंत दूध देऊ लागली. तिसऱ्या वेताला धान्याचे खाद्य बंद करून हायड्रोफोनिक चारा घालण्यास सुरवात केली. दिवसाला सात ते आठ किलो हायड्रोफोनिक चारा घालून चाऱ्याच्या पद्धतीत बदल केला. तरीही दुग्धोत्पादन स्थिर राहिले. सध्या मक्‍याचा मुरघास देण्यात येत आहे. छोट्या गायीला तीन किलो तर मोठ्या गायीला साडेतीन किलो मुरघास देण्यात येतो. कोरडा चारा प्रत्येक गायीला दिवसातून दोन वेळा देण्यात येतो. याशिवाय दुधाच्या प्रत्येक लिटरला चारशे ग्रॅम या प्रमाणे देण्यात येते. पेंड दिवसा आठशे ग्रॅम, कॅल्शिअम १०० मिली, मल्टी व्हिटॅमिन १० मिली व बत्तीसा पावडर ५० गॅम दिली जाते. 

एका गायीला १७० रुपये खर्च 
चारा व इतर घटकांसाठी एका गायीला १७० रुपये खर्च येतो. ही गाय १० लिटरपर्यंत दूध देते. पन्नास रुपये लिटरपर्यंत दर अपेक्षित धरल्यास ५०० रुपये दर मिळतो. उत्पादन खर्च वजा जाता दिवसाला गायीपासून तीनशे तीस रुपयांपर्यंत नफा मिळू शकतो, असे श्री. दळवी यांनी सांगितले. फॅट चांगले असल्याने तुपाचे उत्पादनही चांगले होते. साधारणत: ३३ लिटर दुधापासून एक किलो तूप होत असल्याने तूप विक्रीतूनही फायदा होत असल्याचे त्यांनी सांगितले. 

बॅंकेतील नोकरी सोडून गाय व्यवस्थापन 
पैर्णिमा या कोल्हापुरातील स्टेट बॅंकेत स्पेशल असिस्टंट म्हणून नोकरीस होत्या. पण तीन वर्षापासून त्यांनी बड्या पगाराची नोकरी सोडून गायीच्या व्यवस्थापनात लक्ष घातले आहे. त्या स्वत: दोन्ही गायींचे व्यवस्थापन पतीच्या सीहाय्याने करतात. योग्य नियोजन केल्यानेच दुधाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाली. साध्या देशी गायींच्या दुग्धोत्पादनात लक्षणीय वाढ होऊ शकते, हे आम्ही प्रयोगातून दाखवून दिल्याचे दळवी कुटुंबीयांनी सांगितले. 
संपर्क : सतीश दळवी (७८७५३२६२९८) 

Web Title: milk market