राज्यात नव्याने ३ हजार १६५ नवीन तलाठे सज्जे

सूर्यकांत नेटके
गुरुवार, 1 जून 2017

नगर - राज्यातील वाढती लोकसंख्या आणि वाढत्या नागरीकरणाच्या अनुषंगाने महसूल विभागाच्या कामात झालेली वाढ लक्षात घेऊन शासनाने राज्यात नव्याने ३ हजार १६५ नवीन तलाठे सज्जे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात ५२८ नवीन महसूल मंडळे असतील. नवीन तलाठी सज्जे व महसूल मंडळाच्या निर्मितीनंतर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती तीन हजार सहाशे ९३ नवीन पदांना मंजुरी देईल. नवीन तलाठी सज्ज्यांच्या निर्मितीमुळे राज्यातील ग्रामीण भागातील शेती क्षेत्र व सातबारासंबंधी प्रश्‍न सुटण्यास मदत होणार आहे.

राज्यात लोकसंख्या वाढत आहे. त्यासोबत नागरीकरण होत असल्याने महसूल विभागावर कामाचा ताण येत आहे. कामे वाढलेली असताना महसूल मंडळे व तलाठी सज्जे कमी पडत आहेत. त्यात अनेक ठिकाणी तलाठी पदाच्या जागाही रिक्त आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर काही दिवसांपूर्वी तलाठी भरती करणार असल्याचे सरकारकडून सांगितले जात होते. राज्याच्या महसूल विभागाने नुकताच अध्यादेश काढला असून, राज्यात नव्याने ३ हजार १६५ तलाठी सज्जेनिर्मिती करण्याला मान्यता दिली आहे. नवीन तलाठी सज्जे करताना ५२८ नवीन महसूल मंडळे असतील. कोकण विभागात सर्वाधिक तलाठी सज्जे व महसूल मंडळे असून, त्या खालोखाल नाशिक विभागात सज्जेनिर्मिती होईल. 

विभागीय आयुक्‍त्याच्या आदेशानुसार, मोठ्या सज्जांची व मंडळाची फोड करून, तिथे गरजेनुसार नवीन मंडळ, सज्जानिर्मिती व नवीन पदनिर्मितीबाबतचा अहवाल आर्थिक भारासह योग्य तो अहवाल जिल्हाधिकारी शासनाला कळणार आहेत. सहा तलाठी सज्जासाठी एक महसूल मंडळ असेल. तलाठी सज्जे व महसूल मंडळाच्या मिळून तीन हजार सहाशे ९३ पदांची निर्मिती होईल. या पदांची पुढील चार वर्षात सरळ सेवा भरती केली जाणार आहे.

महसूल मंडळावर कामाचा वाढता ताण पाहता, अनेक ठिकाणी सातबारा, आठ अ उताऱ्यांसह अन्य शेतीविषयक बाबी रखडलेल्या आहेत. सातबारा संगणकीकरण होत असले, तरी त्यात अनेक भागांत अडचणी येत आहेत. नव्या पदाच्या निर्मितीमुळे मनुष्यबळ वाढून या अडचणी सुटण्यास मदत होणार आहे.

Web Title: nagar news nagar talahi office