धानपिकांवर रोगाचा प्रादुर्भाव; शेतकरी चिंतित

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

काचुरवाही - नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना पीक घेता आले नाही. पाण्याची  थोडीफार व्यवस्था असलेल्यांनी धानपिकांची कशीबशी लागवड केली. पीक कापणीला आले असताना तुडतुडा किडीने आक्रमण केले. यामुळे शेतकरी चिंतेत सापडला असून, हातात आलेले पीक जाणार की राहणार अशी चिंता त्यांना सतावत आहे.

यंदा पाहिजे त्या प्रमाणात पाऊस न आल्याने काही शेतकऱ्यांनी काहीच पेरले नाही. काहींनी सट्टा खेळत पेरणी केली व पावसाच्या प्रतीक्षेत राहिले. पेंचचेही पाणी न मिळाल्यामुळे स्थिती विकट झाली. कसेबसे धानपीक कापणीला आले असताना तुडतुडा किडीने पिकांवर आक्रमण केले. यामुळे उभे पीक वाळायला लागले आहेत. धानाचे लोंब सडत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना पीक वाचविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. संबंधित विभागाने पिकांची पाहणी करून मोबदला द्यावा, अशी मागणी विठ्ठल मोहनकार, गोविंदा हिंगे, लहू बादुले, रामचंद्र बावनकुळे, विलास बावनकुळे, सच्चादौरा रेड्डी, रामदास गोल्हर, महादेव बावनकुळे, रूपचंद बावनकुळे, विनोद बावनकुळे, कैलास धावडे आदी शेतकऱ्यांनी केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur news farmer Infestation of crops