नागपूर बाजारात गहू आणि तांदूळ स्थिर

विनोद इंगोले
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

नागपूर - बाजारात सरबती गहू गेल्या आठवडाभरापासून स्थिर असल्याचे चित्र आहे. बाजारात २१०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल दराने गव्हाचे व्यवहार होत आहेत. लुचई तांदूळदेखील १९०० ते २२०० रुपये प्रतिक्‍विंटलवर स्थिर असून, तांदळाची ८०० क्‍विंटलची आवक नोंदविण्यात आली आहे.

बाजार समितीत हरभऱ्याचीदेखील आवक होत आहे. १९० ते २९० क्‍विंटलची आवक सरासरी असून, हरभरा दरात काहीशी घसरण झाली आहे. ४००० ते ४६०० रुपये प्रतिक्‍विंटल असलेला हरभरा ४५०० रुपये प्रतिक्‍विंटलवर आला आहे. २४ ते ४६० क्‍विंटल अशी आवक असलेल्या तुरीचे दर ३५५० ते ३९२६ रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. बाजारात सोयाबीनची आवक दररोज वाढती आहे. ५१०० क्‍विंटलपेक्षा अधिकची आवक सोयाबीनची होत आहे. २२४० ते  २७२६ रुपये प्रतिक्‍विंटल असे सोयाबीनचे दर आहेत. मोठ्या आकाराच्या संत्रा फळाची आवक १२०० ते १५०० क्‍विंटलची आहे. २४०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटल असे संत्रा दर आहेत. 

मोसंबीचीदेखील बाजारात आवक होत असून, मोसंबीची दररोजची सरासरी आवक २५०० क्‍विंटलची आहे. २५०० ते ३३०० रुपये प्रतिक्‍विंटलने मोसंबीचे व्यवहार होत आहेत. डाळिंबाचीदेखील बाजारात आवक आहे. १००० ते ८००० रुपये प्रतिक्‍विंटल असे डाळिंबाचे दर असून, आवक ११०० ते २४०० क्‍विंटल अशी आहे. बटाटा आवक आठवड्यात ३००० ते ७००० क्‍विंटलची झाली. ५०० ते ७०० रुपये प्रतिक्‍विंटल असा बटाट्याचा दर होता. सोमवारी (ता. ३०) पांढऱ्या कांद्याची १००० क्‍विंटल आवक झाली. ६०० ते २४०० रुपये प्रतिक्‍विंटल दराने कांदा व्यवहार झाले.

Web Title: nagpur news rice wheat agrowon