नाशिकमध्ये वांगी सरासरी ८५०० रुपये क्विंटल

brinjal
brinjal

नाशिक - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या भाजीपाला आवक कमी झाली आहे. त्यात वांग्यांची आवक घटली आहे. ती अवघी ९३ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ७००० ते १००००, तर सरासरी दर ८५०० रुपये राहिला. वांग्यांना मागणी असल्याने व दरात तेजी  आहे, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

बाजारात शेतीमालाची आवक सर्वसाधारण आहे. त्यामुळे सध्या दरात सुधारणा कायम आहे. फ्लॉवरची आवक १९४ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १४३० ते ३२१४, सरासरी दर २३२० राहिला. कोबीची आवक ५६७ क्विंटल झाली. तिला १८७५ ते ४१६५, तर सरासरी दर ३१२५ राहिले. ढोबळ्या मिरचीची आवक १०० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ६२५० ते ८७५०, तर सरासरी दर ७८१० रुपये राहिला. भोपळ्याची आवक १२५५ क्विंटल, तर ६६५ ते १३३५, तर सरासरी दर १००० रुपये राहिला. कारल्याची आवक १२५५ क्विंटल झाली. त्यास ६६५ ते १००० असा दर मिळाला. चालू सप्ताहात आवक वाढल्याने दरात घसरण झाली. सर्वसाधारण दर १००० राहिला. 

आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दोडक्याची आवक १३६ क्विंटल झाली. त्यास ४१६५ ते ६२५०, तर सरासरी दर ५४१५ राहिला. गिलक्यांची आवक ८० क्विंटल झाली. त्यास ३३३५ ते ५००० दर मिळाला. सर्वसाधारण दर ४१६५ रुपये राहिला. भेंडीची आवक २७ क्विंटल झाली. त्यास २६६० ते ४७९० दर मिळाला. सर्वसाधारण दर ३५४० राहिला. काकडीची आवक १४८७ क्विंटल झाली. तिला ७५० ते १३६५, तर सरासरी दर १००० राहिला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कांद्याची आवक २९३ क्विंटल झाली. त्यास २५६० ते ५६०० रुपये दर मिळाला. त्यास सर्वसाधारण दर ४७५० राहिला. बटाट्याची आवक ७७५ क्विंटल झाली. तिला २५०० ते ३७००, तर सरासरी दर ३१०० राहिला. लसणाची आवक १७ क्विंटल झाली. तिला ६२५० ते १२००० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ८५०० राहिला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com