सिन्नरचे दोनशे शेतकरी ‘समृद्धी’ला देणार जमीन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

नाशिक - जिल्ह्यात समृद्धी प्रकल्पासाठी जमीन खरेदीचे व्यवहार सुरू झाल्यानंतर आता शेतकरी जमीन देण्याबाबत चौकशी करत आहेत. ज्या सिन्नर तालुक्यातून जमीन देण्यास विरोध होत आहे, तेथीलच २०० शेतकऱ्यांनी जमीन देण्यासाठी संमती दिल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. दुसरीकडे इगतपुरी तालुक्यातील २५ शेतकऱ्यांनी पुढे येत संमती दिल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे संमती दिलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी तसेच इतर बाबींची तातडीने मोजणी केली जात असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. 

मुंबई-नागपूर समृद्धी प्रकल्पासाठी इगतपुरी व सिन्नर तालुक्यांतील १५ शेतकऱ्यांची जमीन प्रशासनाने शनिवारी (ता. २९) थेट खरेदी केली. या खरेदीनंतर अवघ्या एका तासात संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत एकूण १३ कोटी ७० लाखांची रक्कम प्रशासनाने आरटीजीएसद्वारे जमा केली. या खरेदी व्यवहारानंतर जमीन देण्यासाठी शेतकरी पुढे येत असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली. दरम्यान, इगतपुरी व सिन्नर तालुक्यांतील काही ज्येष्ठ शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. ३१) जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. या वेळी जमीन देण्याची तयारी या शेतकऱ्यांनी दाखविली. मात्र जमीन विक्रीतून मिळणारा पैसा मुलाबाळांकडून काढून घेतला जाण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. त्यामुळेच भविष्यात आमचे उपजीविकेचे साधनच हिरावले जाणार असल्याचे मत या शेतकऱ्यांनी बोलून दाखविले.

जिल्ह्यात समृद्धी प्रकल्पासाठी जमीन खरेदीचे व्यवहार सुरू झाल्यानंतर शेतकरी जमीन देण्याबाबत चौकशी करत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. सिन्नर तालुक्यातून २०० शेतकऱ्यांनी जमीन देण्यासाठी संमती दिली आहे. तसेच इगतपुरी तालुक्यातील २५ शेतकरी जमीन देण्यास समोर आल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले     आहे. 

शेतकरी भूमिहीन होऊ नये यासाठी प्रयत्न
प्रकल्पातील जमिनीच्या मोबदल्यात चांगली रक्कम मिळणार असली तरी शेतकरी भूमिहीन होऊ नये यासाठी आमचे प्रयत्न आहे. त्यासाठी समृद्धी प्रकल्पबाधित शेतकरी पुढे आल्यास त्यांचे व माझे संयुक्त खाते उघडून त्यात मोबदल्याची रक्कम ठेवली जाईल. या रकमेत संबंधितांना दुसरी जमीन घेण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी सांगितले.

Web Title: nashik news agrowon farmer