नाशिक जिल्ह्यात प्रथमच भात खरेदी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मार्च 2017

नाशिक - शासनाच्या खरेदी केंद्रांमार्फत शक्यताे पूर्व विदर्भात भात खरेदी केली जाते; मात्र यंदा नाशिक जिल्ह्यात प्रथमच आधारभूत किमतीवर भात खरेदी केली जात आहे. आदिवासी विभागामार्फत केल्या जात असलेल्या खरेदीत आत्तापर्यंत पाच हजार ३७३ क्विंटल भात खरेदी करण्यात आली आहे. दरम्यान, मका खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, त्याचा लिलावाचा प्रस्ताव पुरवठा विभागाने शासनास पाठविला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

 शासनाने धान खरेदीत यंदा प्रथमच मक्याबरोबरच भात खरेदी करण्याचे निर्देश पुरवठा विभागाला दिले होते. त्यानुसार पुरवठा विभागाने आदिवासी विभागाच्या नाशिक प्रादेशिक कार्यालयामार्फत सुरगाण्यात भात खरेदी सुरू केली आहेे. अप्रत तसेच साधारण अशा दोन प्रकारांमध्ये ही खरेदी केली जात आहे. त्यासाठी सरकारने आधारभूत किंमत ठरवून दिली आहे. साधारण भाताच्या क्विंटलसाठी एक हजार ४७०, तर अप्रतसाठी हीच किंमत एक हजार ५१० रुपये क्विंटल इतकी आहे. येत्या ३१ मार्चपर्यंत ही खरेदी केली जाणार आहे. 

 जिल्ह्यात दोन संस्थांमार्फत ९ तालुक्यांमध्ये १३६५ रुपये क्विंटल या आधारभूत किमतीद्वारे मका खरेदी पूर्ण करण्यात आली आहे. त्यात महाराष्ट्र स्टेट को-ऑप मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून ३७ हजार ६३२.३० क्विंटल मका खरेदी करण्यात आली. ही खरेदी सिन्नर, येवला, चांदवड, नांदगाव, मालेगाव, सटाणा, देवळा आणि निफाड या तालुक्यांत करण्यात आली. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवसी विकास महामंडळामार्फत ४९९.५० क्विंटल मका खरेदी कळवण तालुक्यात करण्यात आली. 

मका खरेदीचा गेल्या तीन वर्षांतील अनुभव लक्षात घेता, प्रशासनाला आधारभूत किमतीपेक्षा कमी भावाने मका विक्री करावी लागत आहे. विक्रीसाठी तीन-तीन वेळा लिलाव बोलविण्याची वेळ पुरवठा विभागावर आली आहे. त्यामुळेच यंदा मका खरेदी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रशासनाने आपला प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर पुढील लिलावाची प्रक्रिया बोलविण्यात येणार आहे 

Web Title: nashik rice market