esakal | गुलाब शेतीतून महिन्याकाठी एक लाखाचा नफा
sakal

बोलून बातमी शोधा

गुलाब शेतीतून महिन्याकाठी एक लाखाचा नफा

पांरपरिक पद्धतीने शेती न करता शेतीवर भविष्यात येणाऱ्या संकटाचा विचार करून मेहनत आणि योग्य नियोजन केल्यास त्यावर मात करता येते, हे सावनेर तालुक्‍यातील केळवदजवळील जलालखेडा येथील दिनेश मांडवकर या प्रगतिशील शेतकऱ्याने आपल्या कृतीतून दाखवून दिले.

गुलाब शेतीतून महिन्याकाठी एक लाखाचा नफा

sakal_logo
By
अशोक डाहाके

केळवद - पांरपरिक पद्धतीने शेती न करता शेतीवर भविष्यात येणाऱ्या संकटाचा विचार करून मेहनत आणि योग्य नियोजन केल्यास त्यावर मात करता येते, हे सावनेर तालुक्‍यातील केळवदजवळील जलालखेडा येथील दिनेश मांडवकर या प्रगतिशील शेतकऱ्याने आपल्या कृतीतून दाखवून दिले. गुलाबाच्या फुलशेतीतून एका एकरात एक लाख रुपयांचा निव्वळ नफा एका महिन्यात घेऊन त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

सततची नापिकी तसेच पांरपरिक पद्धतीचे कपाशी, सोयाबीन, तूर, हरभरा, गहू, संत्रा या पिकांच्या भरवशावर विशेषतः नागपूर जिल्ह्यात शेतकरी शेती करीत असतात. यातून दरवर्षी शेतकऱ्यांच्या पदरात यश कमी आणि अपयश अधिक येते. अशातच दिनेश मांडवकर या प्रगतिशील शेतकऱ्याने राष्ट्रीय फलोत्पादन अतंर्गत योजनेतून पन्नास टक्‍के अनुदान तत्त्वावर ३९ लाखांचे कर्ज घेत शेतातील एका एकरात पॉलीहाउस (हरितगृह) उभारून यात मागील एक वर्षात गुलाब फुलाची शेती करीत आहेत. कृषितज्ज्ञांचे मार्गदर्शन तसेच विविध फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीला भेट देत यातून अभ्यास करीत स्वत:च्या शेतात गुलाबाची फुलशेती फुलवून नियमित आठ मजुरांना रोजगार देत आहेत. नकारात्मक विचार दूर ठेवून विक्रमी गुलाबाच्या शेतीतून उत्पन्न घेत लाखोंच्या घरात महिन्याला निव्वळ नफा घेणारे प्रयोगशील शेतकरी दिनेश मांडवकर यांच्याकडून शेतकऱ्यांनी बोध घेणे गरजेचे आहे.

शेतीविषयक वेगवेगळे प्रयोग करून वेगवेगळ्या पिकांचे उत्पन्न घेणे, गुलाबाची शेती करीत असताना पॉलीहाउस पूरक हवामान निर्माण करणे, तसेच खत, फवारणी वेळेवर देणे, यामुळे गुलाब शेती बहरली. गुलाबाच्या फुलांच्या शेतीतून लाखोंचा नफा मिळत असल्याने पुढे शिर्डी गुलाब, कामिनी, शेवंती, कलकत्ता झेंडू यांसारख्या फुलांची शेती करायचा मानस असून यासाठी अरब देशात नागपूर येथून गुलाबांची फुले निर्यात झाल्यास गुलाब शेती करणाऱ्यांना मोठा फायदा मिळणार.
- दिनेश मांडवकर, गुलाबफूल उत्पादक, जलालखेडा

loading image
go to top