
काही शेतकऱ्यांचा लागवड केलेला कांदा रोपे अतिपावसाने वाहून गेली. उर्वरित कांदा रोपांवर लागवड केलेला लाल कांदा काढणीस आला असून, सध्या नगर तालुक्यात हा कांदा काढण्याची लगबग चालू आहे.
नगरमध्ये उन्हाळी कांदा लागवडीस वेग;भारनियमनाचा शेतकऱ्यांना फटका
नगर - प्रदीर्घ चाललेल्या पावसाळ्यानंतर आता नगर तालुक्यातील लाल (नाशिक) कांदा काढणीस तसेच उन्हाळी (गावरान) कांदा लागवडीस वेग आला आहे. सततच्या पावसाने लागवड केलेला लाला कांदा बऱ्याच प्रमाणात खराब झाला. तर काही शेतकऱ्यांचा लागवड केलेला कांदा रोपे अतिपावसाने वाहून गेली. उर्वरित कांदा रोपांवर लागवड केलेला लाल कांदा काढणीस आला असून, सध्या नगर तालुक्यात हा कांदा काढण्याची लगबग चालू आहे.
आणखी बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
उन्हाळी कांदा रोपे लागवडीच्या वेळेस ही अवकाळी पावसाने फटका दिल्याने अनेकांची गावरान कांदा रोपे वाहून गेली होती. काहींनी पुन्हा नव्याने बी आणून रोपांची लागवड केली. तर काहींनी दामदुप्पट पैसे देत गावरान कांद्याची रोपे विकत घेतली आहेत.
Success story: शेळीपालनाने दिली आर्थिक प्रगतीची दिशा...
गेल्या महिनाभरापासून पावसाने पूर्णतः उघडीप दिल्याने शेताची मशागत करून गावरान कांद्याची लागवड सुरू केली आहे. मात्र काही भागांत भारनियमन असल्याने कडक थंडीत अगदी पहाटेपासूनच कांदा लागवडीच्या कामास सुरुवात करावी लागते. नगर तालुक्यात भारनियमन असल्याने ज्या भागात वीज उपलब्ध आहे, त्या भागात मजुरांना भल्या पहाटे किंवा रात्री उशिरापर्यंत कांदा लागवड करावी लागते. त्यामुळे एका शेतकऱ्याकडे तीन दिवस कांदा लागवड केली, की मदत करणाऱ्या दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतात पुढील तीन दिवस लागवड केली जाते.
हेही वाचा : फुलांच्या शेतीला हवा ‘एकी’चा दरवळ
Web Title: Onion Being Extracted Nagar Taluka Load Regulation Hits Farmers
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..