रांगडा कांद्याची लागवड वाढणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

लेट खरिपात ५७ हजार ४०४ हेक्टर क्षेत्र

पुणे - गेल्या दीड महिन्यापासून रांगडा (लेट खरीप) कांद्याची लागवडी सुरू झाल्या आहेत. राज्यात आतापर्यंत ५७ हजार ४०४ हेक्टरवर रांगडा 
कांद्याची लागवड झाली आहे, 

लेट खरिपात ५७ हजार ४०४ हेक्टर क्षेत्र

पुणे - गेल्या दीड महिन्यापासून रांगडा (लेट खरीप) कांद्याची लागवडी सुरू झाल्या आहेत. राज्यात आतापर्यंत ५७ हजार ४०४ हेक्टरवर रांगडा 
कांद्याची लागवड झाली आहे, 

असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. राज्यात रांगड्या कांद्याचे सरासरी ८१ हजार ९६४ हेक्टर एवढे क्षेत्र आहे. दरवर्षी शेतकरी लागवड खरीप हंगामात बाजरीचे पीक काढणीनंतर करतात. यासाठी कांद्याचे बी जुलै ते आॅगस्ट महिन्यात गांदी वाफ्यावर टाकतात. लागवड सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून आॅक्टोबरपर्यंत करतात. तर लागवड केलेल्या कांद्याची काढणी जानेवारी फेब्रुवारी महिन्यात करतात. या हंगामातील कांद्याचे उत्पन्न चांगले मिळते. या लागवडीचे वैशिष्ट म्हणजे कांदा थंडीच्या वातावरणात पोसतो. 

गेल्या वर्षी रांगडा कांद्याची एक लाख २८ हजार ६११ हेक्टरवर लागवड झाली होती. त्याचे उत्पादन १६ लाख १० हजार ९१० मेट्रिक टन एवढे उत्पादन झाले होते. कांद्याचे आगार असलेल्या नाशिक जिल्ह्यात ३० हजार ४४ हेक्टरवर लागवड झाली आहे. तर पुणे जिल्ह्यात आठ हजार ९६० हेक्टरवर लागवड झाली आहे. यंदा चांगल्या झालेल्या पावसामुळे रांगड्या कांद्याचे क्षेत्र वाढणार असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.
 

खरिपात ५३,५२९ हेक्टरवर लागवड

दरवर्षी शेतकरी खरीप कांद्याची लागवड करण्यासाठी गादीवाफ्यावर जून- जुलैमध्ये रोपे तयार करतात. त्याची लागवड जुलै ते आॅगस्टमध्ये करतात. त्याची काढणी नोव्हेबर ते डिसेबरमध्ये काढणी करतात. राज्यात खरीप कांद्याचे सरासरी ६८ हजार ६५८ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी यंदा खरीप हंगामात ५३ हजार ५२९ हेक्टरवर लागवड झाली आहे. यात नाशिक विभागात २० हजार ५०० हेक्टर, पुणे २०,१३६, कोल्हापूर २१०२, औरंगाबाद २७४०, लातूर ७९९६, अमरावती ४८ आणि नागपूर विभागात ६ हेक्टरवर लागवड झाली आहे. सध्या खरीप आणि लेट खरीप कांदा अशी दोन्हीची एकूण एक लाख १० हजार ९३३ हेक्टरवर लागवड झाली आहे. 

खरीप व लेट खरीप कांद्याची एकूण झालेली लागवड ः 
विभाग       लागवड (हेक्टरमध्ये) 

नाशिक       ५२ ४२३ 
पुणे       २९,३७९ 
कोल्हापूर      २१०२ 
औरंगाबाद      २७४० 
लातूर       २१२८६ 
अमरावती      २९८९ 
नागपूर       १४

Web Title: onion planting increased