पैठणमध्ये मोजमापास प्रारंभ

प्रतिनिधी
सोमवार, 1 मे 2017

औरंगाबाद - पैठण येथील तूर खरेदी केंद्रावर शनिवारी (ता. २९) शासन आदेशानुसार तूर खरेदी सुरू करण्यात आली. शनिवारी दुपारनंतर सुरू करण्यात आलेल्या खरेदीत पहिल्या दिवशी ४८ क्‍विंटल तूर खरेदी केली गेली. रविवारी (ता. ३०) दुसऱ्या दिवशीही हमीभावाने तूर खरेदी सुरू होती. 

पैठण येथील खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात तूर शिल्लक असून, त्या तुरीची खरेदी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत होती. तूर खरेदी होत नसल्याने अन्नदाता शेतकरी संघटनेने शासन आदेशाची शुक्रवारी (ता. २८) होळी केली होती. त्यानंतर शनिवारी तूर खरेदी सुरू करण्यात आली. शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करून 

इलेक्‍ट्रॉनिक काट्याद्‌वारे तूर खरेदी प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. पैठणच्या तूर खरेदी केंद्रावरील खरेदी साधारणपणे दहा दिवस चालण्याची शक्‍यता आहे. 

दररोज किमान ६०० ते ७०० क्‍विंटल तूर खरेदीचे नियोजन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. सध्या केंद्राच्या परिसरात जवळपास २२५ वाहने सुमारे ५५०० क्‍विंटल तूर घेऊन उभी असून, काही शेतकऱ्यांनी भाडे द्यावे लागू नये, म्हणून केंद्राच्या आवारात तूर पोत्यांची थप्पी लावली आहे. तूर खरेदी सुरू करतेवेळी पैठण बाजार समितीचे सभापती राजू भूमरे, विनोद बोंबले, सहायक उपनिबंधक श्रीाराम सोन्ने, सचिव नितिन विखे, औरंगाबाद मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापक चंद्रकांत खाडे, विजय हजारे, राम एरंडे, भाऊ लबडे उपस्थित होते.

शासनाची तूर खरेदी २२ एप्रिल रोजी थांबवण्यात आल्यानंतर बाजार समितीच्या वतीने तूर खरेदी सुरू होण्याची आशा ठेवून बाजार समिती आवारात ठाण मांडून असलेल्या शेतकऱ्यांची चहा, पाणी, नाश्‍ता व दोन वेळच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती, अशी माहिती बाजार समिती सचिव नितीन विखे यांनी दिली. 

Web Title: Paithan Tur Purchase