कडधान्य आयात ४६ टक्के वाढली

Pulses
Pulses

एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यान २३ लाख टन आयात; उत्पादन घटले
नवी दिल्ली - देशात यंदा कडधान्य उत्पादन घटल्याने आयात ४६ टक्क्यांनी वाढली आहे. एप्रिल ते नोव्हेंबर २०१९ या काळात २३ लाख टन कडधान्य आयात झाली आहे. मागील हंगामात याच काळात १६ लाख टन आयात झाली होती, अशी माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली. 

जगात भारत हा सर्वाधीक कडधान्य आयात करणारा देश आहे. ‘‘देशात २०१९-२० वर्षात कडधान्य उत्पादन घटल्याने आयात वाढली आहे. सध्या उपलब्ध असलेल्या साठ्यापेक्षा बाजारात कडधान्याला मागणी अधिक आहे,’’ असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मागील वर्षी २०१८-१९ मध्ये कडधान्य उत्पादन ८६ लाख टन झाले होते. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादन घटून ८२ लाख टनांवर आले आहे.

शेंगवर्गीय कडधान्याच्या उत्पादनातही गेल्या वर्षी मोठी घट झाली होती. २०१८-१९ मध्ये शेंगवर्गीय कडधान्य २३४ लाख टन झाले होते. त्याआधीच्या वर्षात हे उत्पादन २५४ लाख टन झाले होते, अशी माहिती कृषी मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीतून मिळाली.

सरकारने तूर आयातीचा चार लाख टन तर मूग आयातीचा एक लाख ५० हजार टन कोटा दिला होता. अलीकडेच सरकारने उडीद आयातीचा कोटा दोन लाख टनांवरून चार लाख टन केला होता. 

मसूरची सर्वाधिक आयात
कडधान्य आयातीत मसूरचा वाटा हा मोठा आहे. एप्रिल ते नोव्हेंबर या काळात मसूरची ६ लाख ८८ हजार ८१७ टन आयात झाली होती. मागील हंगामात याच काळात मसूरची आयात एक लाख ५१ हजार ४०३ लाख टन झाली होती. एप्रिल ते नोव्हेंबर या काळात तुरीची आयात ३ लाख २० हजार ८१२ टन झाली आहे. तर उडदाची आयात एक लाख ९२ हजार १६५ टन झाली. मागील हंगामात उडदाची आयात तीन लाख १७ हजार ४३३ टन झाली होती, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

पीकनिहाय कडधान्य आयात (क्विंटलमध्ये)
पीक    २०१९    २०१८    बदल (टक्के)

तूर    ३३७,३५९     ३२०,८१२     ५.२ 
हरभरा     ७९,८६७     १६,७४०     ३७७.१ 
काबुली हरभरा     १६५,२१२     ७१,६८६     १३०.५ 
उडीद     १९२,१६५     ३१७,४६६     (-)३९.५ 
मूग     ६७,५४१     ७८,३९७     (-)१३.८ 
मसूर     ६८८,८१७     १५१,४०३     ३५५.० 
वाटाणा     ६१२,६९७     ४८९,५१७     २५.२ 
इतर     १५८,७९४     १३१,६०९     २०.७ 
एकूण     २,३०२,४५२     १,५७७,६३०     ४५.९

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com