माॅन्सून लवकरच राज्य व्यापणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 जून 2017

पुणे - उत्तर भारतात कमी दाबाच्या क्षेत्राची स्थिती तयार झाली आहे, त्यामुळे माॅन्सून उत्तरेकडे सरकत आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत माॅन्सून राज्य व्यापण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे. 

माॅन्सूनने शनिवारी (ता. १७) विदर्भातील बुलडाणा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीपर्यंत मजल मारली आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, छत्तीसगडच्या काही भागांत दाखल होण्यासाठी अनुकूल स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे लवकरच माॅन्सून राज्यभर व्यापण्याचा अंदाज आहे. उडिसा, झारखंड आणि बिहारच्या काही भागांत येत्या दोन ते तीन दिवसांत दाखल होण्याची शक्यता आहे. 

सध्या ईशान्य भारताकडील बांगलादेशाच्या परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून नऊशे मीटर उंचीवर आहे. तर, उत्तरेकडील राजस्थानच्या वायव्येचा भाग ते आसाम या भागादरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे क्षेत्र राजस्थानकडून मणिपूरकडे सरकडे सरकत असून उत्तर प्रदेश, बिहार हा भाग हे क्षेत्र व्यापण्याची शक्यता आहे. समुद्रसपाटीपासून हे क्षेत्र नऊशे मीटर उंचीवर आहे. उत्तर प्रदेशच्या परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार होत आहे. ही स्थिती सुमद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर आहे.  हरियानाच्या परिसरातही चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून नऊशे मीटर उंचीवर आहे. तर, महाराष्ट्राचा दक्षिण भाग ते केरळ या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे, त्यामुळे राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस पडत आहे.  

गेल्या ४८ तासांमध्ये उत्तराखंड, उत्तर प्रदेश, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा,  कोकण, गोवा, कर्नाटकाचा दक्षिण भाग, रायलसीमा या भागात मुसळधार पाऊस झाला; तर झारखंड, कर्नाटक, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, तेलंगण, केरळ, तमीळनाडू, पाँडिचेरी या भागांत जोरदार पाऊस झाला. उत्तर प्रदेश, हरियाना, चंदिगढ, दिल्ली, बिहार, उडिसा, पश्चिम बंगाल, सिक्कीम या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडला. देशातील चेरापुंजी, गोअलपारा, शिलाँग, लखनऊ, आग्रताला, रायसेन, दुबरी, दिब्रुगर, रत्नागिरी, वेंगुर्ला, पुणे, सातारा, गोवा येथे सर्वाधिक पाऊस झाल्याची नोंद झाली. 

येत्या चार ते पाच दिवसांत हरियाना, चंदिगढ, दिल्ली, उत्तराखंड, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे; तर केरळ, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि तमीळनाडू व पाँडिचेरी या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.

Web Title: pune agrowon news monsoon in state