मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 मे 2017

पुणे (प्रतिनिधी) - पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रातील नगर, नाशिक, सांगली, सातारा, सोलापूर आणि मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, हिंगोलीसह उस्मानाबाद जिल्ह्यांत सोमवारी (ता. ७) वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. राज्यात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या गारपीट, पावसाने केळी, उन्हाळ कांदा, आंबा, द्राक्ष, डाळिंब बागांसह भाजीपाल्याचेही नुकसान झाले आहे. आज (मंगळवार, ता. ८) आणि उद्या (ता. ९) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या चोवीस तासांमध्ये विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट होती, तर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. गुरुवारी (ता.११) शुक्रवारी (ता.१२) राज्यातील सर्व भागांत तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज असून, उर्वरित भागांत हवामान कोरडे राहणार आहे. सोमवारी सकाळपर्यंत चंद्रपूर येथे ४५.८ अंश सेल्सिअस उच्चांकी तापमानाची नोंद झाली. उर्वरित भागांत तापमान सरासरीच्या जवळपास होते.

सध्या कर्नाटक ते उत्तर प्रदेशच्या मध्य भागापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे राज्यात ढगाळ हवामान असून, वातावरणात दमटपणा तयार झाला आहे. कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मराठवाड्याच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.

सोमवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३७.८, जळगाव ४३.६, कोल्हापूर ३६.१, महाबळेश्वर ३१.०, मालेगाव ४३.०, नाशिक ३७.४, सांगली ३७.८, सातारा ३९.५, सोलापूर ४१.५, सांताक्रूझ ३३.७, अलिबाग ३६.५, रत्नागिरी ३४.३, डहाणू ३५.५, अौरंगाबाद ४१.०, परभणी ४४.०, अकोला ४५.१, बुलडाणा ४१.५, अमरावती ४०.६, चंद्रपूर ४५.८, गोंदिया ४२.८, नागपूर ४२.६, वर्धा ४२.५, यवतमाळ ४४.५,

गेल्या ४८ तासांमध्ये झालेला पाऊस - मिलिमीटरमध्ये
नगर - भाळवणी १.५, वाडेगव्हाण, १३.०, वडझीरे ४.०, देवदैठण ५.६, आश्वी १३.०, शिबलापूर ९.०, समनापूर २.०,
पुणे - भोर ४.०, नसरापूर ४६.०, किकवी ३२.०, आंबवडे १३.०, मंचर ३.०, रांजणगाव ७.०, पाबळ १०.०, शिरूर २.०, बारामती १५.०, मालेगाव १.०, लोणी १.०, सुपा २.०, मोरगाव ३७.०, परिंचे ४२.०, वेल्हा ५२.०,
सोलापूर - पांगरी ७.०, तुनघाट २.०,
सातारा - वार्ये ५.०, शेंद्रे १७.२, नागठाणे ४.२, अपशिंगे ३.०, अनेवाडी ८.२, कुडाळ ३२.२, वाटर स्टेशन १८.०, खटाव ६.१, पुसेगाव २७.२, बुधा २०.०, होळ २.०, खंडाळा १४.०, वाटर १७.०, शिरवळ ४.२, लोणंद १.०, पाचवड २०.०, वाई ४.०, भुईज १६.०,
सांगली - लेंगरे ४.०, विटा २.०, भाळवनी २.०, कडेगाव ५.०, चिंचणी ४.०,
कोल्हापूर - चांदगड ३.०, नारंगवाडी १.०,
भंडारा - भंडारा १.०, बेला १.०, तुमसर १.६, मिटेवानी ४.३, कोढा ४.३, पवनी ११.८, चिंचाळ ३.५, आसगाव ७.३, अकोडी ६.०, पिंपळगाव ५.२,
चंद्रपूर - चिंमूर १२.०, नेरी, ३.१

Web Title: rain in marathwada and center maharashtra