ग्रामीण भागातील व्यवहार ठप्प

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

पुणे - भ्रष्टाचार, खोट्या नोटा, दहशदवाद, हवालाकांडातून देशाला सावरण्यासाठी ५०० व १००० रुपयांच्या नोटा केंद्र सरकारने मंगळवारी (ता. ८) मध्यरात्रीपासून चलनातून बाद केल्याच्या निर्णयाचे स्वागत कृषीसह संलग्न क्षेत्रातूनही करण्यात आले; मात्र बहुतांश ग्रामीण भागातील व्यवहार बुधवारी (ता. ९) पूर्णत: ठप्प झाले. जे काही व्यवहार झाले, त्या ठिकाणी गोंधळाची, तणावाची आणि काही ठिकाणी सामोपचाराची स्थिती दिसून आली. विशेषत: सध्या खरीप शेतमालामुळे गजबजलेल्या बाजार समित्यांत शेतकऱ्यांची आणि ग्राहकांअभावी किरकोळ व्यापाऱ्यांची चांगलीच गोची झाली. याशिवाय पीकविमा भरण्याची आज (ता.

पुणे - भ्रष्टाचार, खोट्या नोटा, दहशदवाद, हवालाकांडातून देशाला सावरण्यासाठी ५०० व १००० रुपयांच्या नोटा केंद्र सरकारने मंगळवारी (ता. ८) मध्यरात्रीपासून चलनातून बाद केल्याच्या निर्णयाचे स्वागत कृषीसह संलग्न क्षेत्रातूनही करण्यात आले; मात्र बहुतांश ग्रामीण भागातील व्यवहार बुधवारी (ता. ९) पूर्णत: ठप्प झाले. जे काही व्यवहार झाले, त्या ठिकाणी गोंधळाची, तणावाची आणि काही ठिकाणी सामोपचाराची स्थिती दिसून आली. विशेषत: सध्या खरीप शेतमालामुळे गजबजलेल्या बाजार समित्यांत शेतकऱ्यांची आणि ग्राहकांअभावी किरकोळ व्यापाऱ्यांची चांगलीच गोची झाली. याशिवाय पीकविमा भरण्याची आज (ता. १०) शेवटची मुदत असल्याने शेतकऱ्यांना विमा योजनेपासून मुकावे लागण्याचे चित्र दिसते आहे.

निर्णयाचे परिणाम...

 • अनेक बाजार समित्यांत व्यवहार झाले नाहीत
 • पीक विम्याची आज शेवटची तारीख; पण पैसे नाहीत
 • बॅंका, पोस्ट बंद असल्याने अडचणीत मोठी वाढ
 • ‘विश्‍वासा’वर अनेक ठिकाणी व्यवहार करण्यात आले
 • पेट्रोल, डिझेलपंपांवर काही काळ तणावस्थिती 
 • सुटे पैसे नसल्याने ग्रामीण महाराष्ट्रात गोंधळाची स्थिती 

बॅंक; सोसायट्या कामकाज थंडावले

 • बुधवारचे कोणतेही व्यवहार बॅंकांच्या मार्फत झाले नाहीत
 • बॅंक कर्मचारी अंतर्गत कामात व्यस्त, यामुळे समाधानकारक माहिती नाही
 • दोन-तीन दिवस तरी शेतकऱ्यांनी कोणतेच व्यवहार करू नयेत, असे अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आवाहन
 • विविध सेवा सोसायट्यांचे कामकाजही थंडावले

 

शेतीविषयक किटकनाशके, खते उधारीवर..

 • शहरी तसेच ग्रामीण भागातील किटकनाशके खरेदी-विक्रीचे व्यवहार थंडावले.
 • शहरी भागातील काही दुकानांतून पाचशे-हजार रुपयांच्या नोटांचा स्वीकार
 • ग्रामीण भागात मात्र अडचणी, अनेक ठिकाणी उधारीवर  किटकनाशके खरेदी
 • काही किटकनाशके विक्रेत्यांची दहा तारखेपर्यंत पाचशे, हजारच्या नोटा स्वीकारण्याची तयारी. 

खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद 

 • यंत्रे खरेदी-विक्री, जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार थंडावले. अनेक खरेदीदारांकडून दोन-तीन दिवस थांबण्याची सूचना धनादेशाची रिस्क घेण्यास दुकानदारांचा  नकार
 • या निर्णयाची माहिती कळाल्यानंतर मी माझे सगळे आर्थिक व्यवहार दोन-तीन दिवस तरी पुढे ढकलले आहेत. भाजीपाल्याची किरकोळ विक्री करण्यासाठी बाजारात जात आहे; पण ग्राहकांना पाचशे रुपयांच्या नोटा देणार नसाल, तरच भाज्यांची खरेदी करा, असे दोन-तीन दिवस तरी सांगावे लागणार आहे. 

- विश्‍वास कोळी, कोडोली, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर

विहिरीवरील पंप बंद पडला आहे. दुरुस्तीसाठी पैशाची गरज आहे. त्यामुळे वाहनातून सोयाबीन विक्रीस आणले परंतु व्यापारी तीन दिवसानी पैसे देणार आहेत. पंप दुरुस्ती रखडली. पेरणीसाठी रान ओलावण्याचे कामदेखील लांबवावे लागले. वाहनाचे भाडे देण्यास पैसे नाहीत.
 - माणिक घुले, पान्हेरा (ता. परभणी)
 

निर्णय स्वागतार्ह आहेच. सरकार पुन्हा नव्याने पाचशे, हजाराच्या नोटा बाजारात आणणार असल्याने त्यावर मार्ग निघेल. रोज बाजारात माल नेणाऱ्या व त्यावर प्रपंच चालविणाऱ्या शेतकऱ्यांना काही दिवस तरी त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.
- राजाराम सांगळे, संचालक- अखिल भारतीय द्राक्ष निर्यातदार संघटना.

Web Title: rural area transaction stop