साैर कृषी पंपासाठी नियमांमध्ये शिथिलता

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

पुणे - सौर कृषी पंपाबाबत नव्याने करण्यात आलेल्या नियमांमध्ये शेती क्षेत्राच्या पाच एकराच्या अटीएेवजी १० एकरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तर १० वर्षांनतर महावितरण कंपनीद्वारे वीज जाेड उपलब्ध हाेणार आहे. काही जाचक अटींमुळे साैर कृषी पंप याेजनेला मिळालेल्या अल्प प्रतिसादामुळे काही नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना नियमित वीजपुरवठा उपलब्ध हाेत नसल्याने केंद्राने साैरपंप याेजनेची ४०० काेटींची घाेषणा केली. या याेजनेअंतर्गत देशात एक लाख शेतकऱ्यांना साैर कृषी पंप देण्यात येणार आहेत. यापैकी महाराष्ट्राला ७ हजार ५४० साैर पंपाचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे. मात्र या याेजनेतील शेतीच्या ५ एकर क्षेत्र आणि भविष्यात वीज जाेड मिळणार नसल्याच्या जाचक अटींमुळे शेतकऱ्यांनी या याजेनेकडे पाठ फिरवली हाेती. यामुळे या याेजनेच्या आढावा आणि पुनर्रचनेबाबत जून महिन्यात बैठक घेण्यात आली हाेती. या बैठकीत वरील दाेन मुद्द्यांमध्ये बदल करण्यावर विचार करण्यात आला.

त्यानुसार आता नवीन बदल करण्यात आले असून, या बदलांमध्ये पाच एकर एेवजी १० एकराची मर्यादा वाढविली आहे. तर भविष्यात लाभार्थ्यास १० वर्षांनतर महावितरणचा वीज जाेड देखील उपलब्ध हाेणार आहे. तसेच या याेजनेत सहभागी हाेण्यासाठी ५ एकर क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी साैर कृषी पंपाच्या दराच्या ५ टक्के आणि १० एकर क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी १५ टक्के रक्कम भरणे आवश्‍यक आहे. या बदलांमुळे याेजनेला प्रतिसाद वाढेल, अशी आशा शासन बाळगून आहे.

Web Title: solar pump rules for agricultural pump extenuation