सोयाबीन उत्पादन घटणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

महाळुंगे पडवळ, जि. पुणे -  आंबेगाव तालुक्‍यातील कळंब, चांडोली बुद्रुक, लौकी परिसरात शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली होती. परंतु मुसळधार पावसाने सोयाबीनचे नुकसान झाले. उत्पादनात ७० टक्‍क्‍यांपर्यंत घट होण्याची शक्‍यता आहे. यंत्राच्या साह्याने सोयाबीन मळणीची शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.

या वर्षी महाळुंगे पडवळ, साकोरे, चास, नांदूर, टाकेवाडी, विठ्ठलवाडी, कळंब, चांडोली बुद्रुक आदी वीस गावांत जवळपास ३५० एकर क्षेत्रात सोयाबीनची लागवड झाली होती. अतिवृष्टीमुळे जवळपास ५० टक्के क्षेत्रातील सोयाबीन पीक अडचणीत आले होते. उर्वरित पिक वाचविण्यात शेतकऱ्यांना यश आले असले, तरी सोयाबीनचे दाणे काळे पडले आहे. सोयाबीनची गुणवत्ता चांगली न राहिल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

शेतकरी अरुण रामकर म्हणाले,की अडीच महिन्यांपूर्वी तीन एकर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी केली. ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या पावसातून कसेबसे पीक वाचविले. परंतु नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घट झाली आहे.कळंब व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी सोयाबीनची मळणी सुरू केली आहे. एका पोत्याच्या मळणीचा ४०० रुपये बाजारभाव आहे. सोयाबीन मळणीसाठी यंत्राला मागणी आहे, असे मळणी यंत्राचे मालक शिवाजी वर्पे यांनी सांगितले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Soybean production will decline