उन्हाचा कडाका वाढू लागला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

भिराचा पारा ४०. ५ अंशांवर 

पुणे - वातावरणातील कोरड्या हवामानामुळे सकाळपासून उन्हाचा कडाका वाढू लागला आहे. भिरा येथे शुक्रवारी (ता. २४) सकाळपर्यंत सर्वाधिक ४०.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमान सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भाच्या उर्वरित भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. 

राज्यातील भिरा येथे कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत ५.२ अंश सेल्सिअसने वाढ झाल्याने कमाल तापमान चाळीस अंशांपर्यंत पोचले आहे, तर मुंबई, जळगाव, रत्नागिरी वगळता उर्वरित प्रमुख शहरांचा पाराही ३५ अंशांच्या वर गेला आहे. गेल्‍या चोवीस तासांत हवामान कोरडे होते. मंगळवारपर्यंत (ता. २८) हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे. 

शुक्रवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात कमाल तापमानातील तफावत (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३६.७ (४), जळगाव ३४.४ (१), कोल्हापूर ३६.९ (३), महाबळेश्‍वर ३३.० (५), मालेगाव ३६.८ (४), नाशिक ३४.० (२), सांगली ३८.४ (४), सातारा ३६.१ (५), सोलापूर ३८.१ (४), सांताक्रूझ ३३.७ (३), अलिबाग ३०.० (१), भिरा ४०.५ (५), रत्नागिरी ३३.५ (३), डहाणू २९.६ (१), अौरंगाबाद ३६.० (२), परभणी ३६.९ (३), अकोला ३५.५ (२), अमरावती ३४.६ (२), बुलडाणा ३२.७ (२), नांदेड ३७.० (३), गोंदिया ३४.० (२), नागपूर ३५.९ (३), वर्धा ३६.१ (४), यवतमाळ ३५.० (३). 

Web Title: summer