चटका वाढला...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

चंद्रपूर पुन्हा ४३.२ अंशांवर ! 

पुणे - कोरड्या हवामानामुळे उन्हाचा सकाळपासून चटका वाढत आहे. गुरुवारी (ता. ६) चंद्रपूर येथे ४३.२ अंश सेल्सिअसची उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. येत्या सोमवारपर्यंत आकाश निरभ्र राहणार असून, मंगळपासून मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात हवामान ढगाळ राहण्याचा अंदाज पुणे हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. 

चंद्रपूर पुन्हा ४३.२ अंशांवर ! 

पुणे - कोरड्या हवामानामुळे उन्हाचा सकाळपासून चटका वाढत आहे. गुरुवारी (ता. ६) चंद्रपूर येथे ४३.२ अंश सेल्सिअसची उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. येत्या सोमवारपर्यंत आकाश निरभ्र राहणार असून, मंगळपासून मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात हवामान ढगाळ राहण्याचा अंदाज पुणे हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. 

गेल्या चोवीस तासांत हवामान कोरडे होते. त्यामुळे कमाल तापमानात सुमारे तीन अंशांपर्यंत वाढ झाली आहे. नागपूरमध्ये सरासरीच्या तुलनेत ३.८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली असून, येथे ४३.० अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. तर नगरमध्ये सरासरीच्या तुलनेत २.९ अंश सेल्सिसची वाढ होऊन कमाल तापमानाची ४०.८ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. उर्वरित शहरामध्येही सरासरीच्या तुलनेत एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढ झाली अाहे. तर रात्री हवेत गारवा तयार होत असल्याने रात्रीच्या तापमानात घट होत आहे. नगरमध्ये सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक ४.२ अंश सेल्सिअसने घट झाली. गुरुवारी सकाळपर्यंत येथे १६.२ अंश सेल्सिअसची किमान तापमानाची नोंद झाली आहे. 

कोकण, गोवा व विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. सध्या मध्य महाराष्ट्राचा दक्षिण उत्तर भाग ते तमिळनाडूचा दक्षिण भाग आणि कर्नाटकाचा अंतर्गत भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे क्षेत्र समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे, असल्याचेही त्यानी सांगितले. 

गुरुवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३७.४ (१७.६), नगर ४०.४ (१६.२), जळगाव ४०.६ (२२.८), कोल्हापूर ३६.३ (२१.३), महाबळेश्वर ३२.६ (१९.०), मालेगाव ४१.४ (२१.८), नाशिक ३६.७ (१८.४), सांगली ३८.२ (२१.०), सातारा ३८.४ (१८.५), सोलापूर ३९.९ (२३.१), सांताक्रूझ ३३.२ (२५.४), अलिबाग ३५.० (२४.३), रत्नागिरी ३१.८ (२३.०), भिरा ४०.७ (२४.५), डहाणू ३४.७ (२५.९), अौरंगाबाद ३९.२ (२०.५), परभणी ४०.४ (२४.२), नांदेड (२३.०), अकोला ४०.६ (२६.१), अमरावती ३९.८ (२५.४), बुलडाणा ३८.० (२५.०), चंद्रपूर ४३.२ (२५.८), गोंदिया ४२.० (२४.५), नागपूर ४३.० (२३.२), वर्धा ४३.० (२५.५), यवतमाळ ४०.५ (२५.४). 

Web Title: summer heat