नगरचा पारा आणखी खाली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणखी गारठले 

पुणे - राज्यातील अनेक भागांत थंडी वाढू लागली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली. नगरमध्ये गुरुवारी (ता. १०) राज्यातील सर्वांत कमी ८.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.

मराठवाड्याच्या काही भाग आणि मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  

राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते, तर कोकण गोव्याच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किचित घट झाली आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये राज्यातील प्रमुख शहरापैकी नगरमध्ये सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ नाशिकमध्ये ९.५, नागपूर ९.८, पुणे ९.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित अमरावती, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ येथे प्रत्येकी -७ अंश सेल्सिअस एवढी तफावत आढळून आली. इतर प्रमुख शहरामध्ये एक ते सहा अंश सेल्सिअसची तफावत होती. गेल्या चोवीस तासामध्ये गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. येत्या शनिवार व रविवार रोजी हवामान अशंत ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर सोमवार पासून (ता.१४)  गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तसेच शनिवारपर्यत मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोवा येथे रात्रीच्या सर्वसाधारण तापमानात घट होणार अाहे. त्यामुळे थंडी वाढणार अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला.

गुरूवार (ता.१०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात किमान तापमानातील तफावत (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ९.९ (-५), नगर ८.१ (-८), जळगाव १०.० (-६), कोल्हापूर १५.७ (-३), महाबळेश्‍वर १३.९ (-१), मालेगाव ११.२ (-४), नाशिक ९.५ (-५), सांगली १४.६ (-३), सातारा १३.२ (-४), सोलापूर १४.१(-५), सांताक्रूझ १६.४ (-५), अलिबाग १८.८(-३), रत्नागिरी १८.३ (-४), डहाणू १८.५ (-३), भिरा १६.५ (-३), अौरंगाबाद १२.३ (-३), परभणी १३.४ (-४), नांदेड १४.५(-१), अकोला ११.९ (-६), अमरावती ११.२ (-७), बुलडाणा १३.८ (-४), चंद्रपूर १३.२ (-४), गोंदिया १०.७ (-७), नागपूर ९.८ (-७), वर्धा ११.५ (-६), यवतमाळ ११.० (-७).

Web Title: temperature down in nagar