राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ३५० ते ३८०० रुपये

शुक्रवार, 24 मे 2019

नाशिक - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. २२) टोमॅटोची आवक १२५० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल किमान ३५० ते कमाल ३००० रुपये असा दर मिळाला, सर्वसाधारण दर १५०० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

नाशिकमध्ये ३५० ते ३००० रुपये
नाशिक - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. २२) टोमॅटोची आवक १२५० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल किमान ३५० ते कमाल ३००० रुपये असा दर मिळाला, सर्वसाधारण दर १५०० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

मंगळवारी (ता. २१) टोमॅटोची आवक १३२८ क्विंटल झाली. त्यास ३२५- ते १००० असा प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १००० रुपये होता. सोमवारी (ता. २०) टोमॅटोची आवक १०४३ क्विंटल झाली. त्यास ५०० ते २७५० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण १००० रुपये असा दर मिळाला. रविवारी (ता. १९) टोमॅटोची आवक १२६० क्विंटल झाली. त्यास ७५० ते २५६६ असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १७५० होते. शनिवारी (ता. १८) टोमॅटोची आवक १२५५ क्विंटल, तर दर ५०० ते २२५० रुपये, सर्वसाधारण दर १००० होते.

शुक्रवारी (ता. १७) टोमॅटोची आवक १५१६ क्विंटल झाली. त्यास ५०० ते २७५५ असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १००० होते.

गुरुवारी (ता. १६ ) टोमॅटोची आवक १२५० क्विंटल, तर दर  ५२७ ते २७५० असा मिळाला. सर्वसाधारण दर १५०० होते. मागील आठवड्यापासून बाजार समितीत टोमॅटोची आवक कमी जास्त होत आहे. अावकेप्रमाणे बाजारभाव निघत असल्याची माहिती मिळाली.

**********************************************************************
नगरला ४०० ते २२०० रुपये 
नगर - नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. २३) टोमॅटोची १३० क्विंटलची आवक झाली. त्यास ४०० ते २२०० व सरासरी १३०० रुपयांचा प्रतिक्विंटल दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीतील सूत्रांनी दिली. 

नगर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा भाजीपाल्याच्या आवकेवर परिणाम झाला आहे. टोमॅटोची आवकही काहीशी कमी झाली आहे. १६ मे रोजी टोमॅटोची ९७ क्विटलची आवक होऊन ४०० ते २२०० व सरासरी १२०० रुपयांचा दर मिळाला. ९ मे रोजी टोमॅटोची ८९ क्विटलची आवक होऊन ४००ते १४०० व सरासरी ९०० रुपयांचा दर मिळाला. 

२ मे रोजी टोमॅटोची ११४ क्विटलची आवक होऊन ४०० ते १५००  सरासरी ९५० रुपयांचा दर मिळाला. २७ एप्रिल रोजी १०८ क्विंटलची आवक होऊन ४०० ते २२०० व सरासरी १२०० रुपयांचा दर मिळाला. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने टोमॅटोची आवक कमी जास्त होत असून दरात ही चढउतार होत आहे.

**********************************************************************
सोलापुरात सर्वाधिक ३००० रुपये
सोलापूर - सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात टोमॅटोला चांगली मागणी राहिली. त्यास प्रतिक्विंटल सर्वाधिक ३००० रुपये दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्राकडून सांगण्यात आले. 

बाजार समितीच्या आवारात या सप्ताहात टोमॅटोची आवक रोज २० ते ३० क्विंटलपर्यंत झाली. दर प्रतिक्विंटल किमान ४०० रुपये, सरासरी १००० आणि सर्वाधिक ३००० रुपये असा मिळाला. या आधीच्या सप्ताहात हाच दर प्रतिक्विंटल किमान ८०० रुपये, सरासरी १२०० आणि सर्वाधिक २५०० रुपयावर होता. तर आवक रोज २० ते ४० क्विंटलपर्यंत होती. 

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आवक एकदमच कमी १० ते १५ क्विंटलपर्यंत झाली. दर प्रतिक्विंटल किमान १२०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये इतका मिळाला; पण वरचेवर आवक कमी होत आहे. त्यामुळे दर आणखी वधारण्याची शक्यता आहे.

**********************************************************************

सांगलीत दहा किलोस ३०० ते ३५० रूपये
सांगली - येथील शिवाजी मंडईत टोमॅटोची आवक कमी झाली आहे. गुरुवारी (ता.२३) टोमॅटोची ५०० क्रेट (एक क्रेट २० किलोचे) आवक झाली. त्यास प्रति दहा किलोस ३०० ते ३५० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

शिवाजी मंडईत सांगली जिल्ह्यातील वाळवा, मिरज, आष्टा, तुंग, दुधगाव, कसबे डिग्रज, खानापूर यासह कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातून आवक होते. गतसप्ताहापेक्षा चालू सप्ताहात टोमॅटोची आवक ५० क्रेट ने कमी झाली. त्याच्या दरात प्रति किलोस १० रुपयांनी वाढ झाली आहे.

बाजार आवारात बुधवारी (ता.२२) टोमॅटोची आवक ४०० क्रेट आवक झाली. त्यास प्रति दहा किलोस ३५० ते ४०० रुपये असा दर होता. मंगळवारी (ता.२१) टोमॅटोची आवक ४५० क्रेट आवक झाली. त्यास प्रति दहा किलोस ३००ते ३५० रुपये असा दर होता. सोमवारी (ता.२०) टोमॅटोची आवक ४०० क्रेट आवक झाली. त्यास प्रति दहा किलोस ३५० ते ४०० रुपये असा दर होता. पुढील सप्ताहात टोमॅटोची आवक कमी होण्याची शक्यता असून दरात वाढ होईल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. 

**********************************************************************

साताऱ्यात २००० ते २५०० रुपये
सातारा - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. २३) टोमॅटोची ३७ क्विंटल आवक झाली. टोमॅटोस क्विंटलला २००० ते २५०० असा दर मिळाला आहे. गेल्या तीन सप्ताहापासून टोमॅटोचे १००० ते २५०० या दरम्यान मिळाले असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

१६ मे रोजी टोमॅटोची ५६ क्विंटल आवक झाली. त्यास १००० ते २००० असा दर मिळाला. नऊ मे रोजी टोमॅटोची ४२ क्विंटल आवक होऊन क्विंटलला १५०० ते २०००, तर दोन मे रोजी टोमॅटोची ३८ क्विंटल आवक होऊन क्विंटलला ५०० ते १००० असा दर मिळाला. दोन मे रोजीचा अपवाद वगळता १००० ते २५०० या दरम्यान दर मिळाला आहे. टोमॅटोची २० ते ३० रुपये प्रतिकिलोप्रमाणे विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली.