तुरीचे पीक करपल्याने नुकसानभरपाई द्यावी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

शेतकऱ्यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन 

अमरावती - तूर पिकावर अचानक कीड-रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने तूर वाळण्यास सुरवात झाली. या पार्श्‍वभूमीवर विमा कंपनी आणि शासनाकडून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना याबाबत निवेदन देण्यात आले. त्यासोबतच वाळलेली तुरीची झाडेही शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दाखविली. 

वलगाव, नया अकोला, पुसदा या भागांतील शेतकऱ्यांनी हे निवेदन दिले. तुरीचे पीक हे नगदी पीक आहे. आंतरपीक व सलग पद्धतीने याची लागवड होते. या वर्षी तुरीचे पीक मोठ्या प्रमाणावर येण्याचा अंदाज होता. त्यासाठीचे पोषक हवामान असल्याचे शेतकऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे. मात्र अचानक हवामानात गारवा वाढीस लागला. 

कडाक्‍याची थंडी पिकाला न सोसल्याने पीक करपल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पीक संपूर्णपणे उद्‌ध्वस्त झाल्याने त्याची दखल घेत विमा कंपनीकडून सर्वेक्षण व पंचनाम करण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. त्यासोबतच शासनाकडून नुकसानभरपाई मिळावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. रणजित तिडके, प्रभाकर तायडे, संजय मोहळकर, प्रशांत विघे, व्ही. आर. वाकोडे, रा. भा. भोरे, सुभाष तायडे, संतोष देशमुख, प्रवीण तायडे या शेतकऱ्यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत. 

Web Title: toor dal farmers