दापोलीच्या कृषी विद्यापीठातील प्रदर्शनात आंब्याचे 43 प्रकार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

कोर्टिन ठरले लक्षवेधी 

दापोली - आंबा लागवड करतानाही किती वैविध्यपूर्ण रीतीने करता येते, याचा नमुनाच येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने सादर केला. एकसुरी लागवडीऐवजी कोणत्याही वाणाच्या आंब्याची लागवड करताना त्यात 10 टक्के झाडे ही वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्याची लावावीत, असा सल्ला विद्यापीठाकडून देण्यात येतो. अशा लागवडीसाठी उपयुक्त विविध 43 प्रकारचे आंबे प्रदर्शनात मांडले होते. हे प्रदर्शन सर्वाधिक लक्षवेधी ठरले. 

या प्रदर्शनाचे उद्‌घाटन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते झाले. प्रदर्शनात कोकणात वाढणाऱ्या 150 विविध प्रकारच्या देशी आणि परदेशी आंब्यांच्या प्रजातींपैकी हापूस, रत्ना, सिंधू, केशर, पायरी, कोकणराजा, कोकणरुची, गोवामाणकुर, तोतापुरी, हत्तीझुल, बैंगनपल्ली, बाटली, वनराज, हायब्रीड 237, छोटा जहांगीर, आम्लेट, आयआय एचआर-13, चित्तूर बदामी, बदामी गोल, परमाल गोवा, काळी हापूस दहानु, मोहन भोग, मोहन भोग, इ एस स्पेशल, वातगंगा, पुलिहारा, कोंडुर गोवा, गधेमार, आलमपूर बाणेशान, रुमानी, पदेरी, केंसिंगटन, टॉमी अटकिन्स, ब्लॅक कोलंबन, विलाय कोलंबन, करूठा कोलंबन, एम-13-3, इस्राईल हायब्रीड, ऑस्टीन, माया, कोर्टिन आणि पामर या आंब्यांची फळे मांडण्यात आली होती. 

कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य, आमदार संजय कदम, संजय केळकर, राजन साळवी, माजी न्यायमूर्ती जे. नारायण पटेल, कुलसचिव जयराम देशपांडे, डॉ. संजय भावे, डॉ. बी. आर. साळवी, डॉ. प्रमोद सावंत, डॉ. सतीश नारखेडे, महेश कुलकर्णी आदी या वेळी उपस्थित होते. 

Web Title: types of mango